.*आदित्य चव्हाणची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड*. (मानवत { अनिल चव्हाण }————————————मानवत येथील श्रीमती सरस्वती बाई भाले पाटील विद्यालयातील विद्यार्थी आदित्य लहू चव्हाण या ने विभागीय पातळीवर यश संपादन केले असून त्याची लातूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय 400 मी. फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत आदित्य चव्हाण यांनी यश घव घवित यश संपादित केले.सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदकुमार नांदगांवकर यांनी सत्कार केला. तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. मुंजाजीराव भाले पाटील, गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी क्रीडा शिक्षक श्री किशन भिसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.***
byMEDIA POLICE TIME
-
0