पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे भुरट्या चोराचे चांगलेच फावले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे! (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार )नंदुरबार: पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे भुरट्या चोराचे चांगलेच फावले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे नुकताच आता खरीप हंगामातील पिके काढणीला सुरुवात झाली असून या भुरट्याच्या सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या चोऱ्यांच्या प्रमाणत मोठी वाढ झाली असून या भुरट्याच्या बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून अति पावसाने कापूस सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने वाचवलेली पिके काही प्रमाणात शेतात उभी असून आत काढणीला सुरुवात झाली असून आधीच अति पावसाने पिकाचे उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर घट येणार असून त्यात लावणी केलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे असताना आता भुरट्या चोरांनी कापूस, सोयाबीन पिकांवर डल्ला मारला असून मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या होत आहेत याबाबत तालुक्यातील पोलीस ठाण्यात शेतकरी गुन्हा नोंद करण्यास येत नाही कारण पोलीसाना कडून होणाऱ्या प्रश्नाचा भडीमार व चोरीच्या तपास लागत नसल्याने शेतकरी पोलीसठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत नाही तरी पोलीस प्रशासने ह्या घटनाये गार्भीय लक्षात घेवून या भुरट्या चोरांवर अटकावण्यासाठी रात्रीच्या व पहाटेच्या जिल्ह्यात, तालुक्यात व शहराचा आजू बाजूच्या रस्त्यावर गस्त सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहेत तसेच शहराच्या आजूबाजूला असलेल्या किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापार्‍याना चोरीच्या पिकांच्या खरेदी केली जात असल्याने या भुरट्या चोराचे चांगले फावले आहे चोर कोण आणि शेतकरी कोण असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पोलिसांनी या व्यापाऱ्यांना समज देऊन चोरीच्या सोयाबीन, कापूस यांची खरेदी करू नका असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला तर या चोरीवर अटकाव होऊ शकतो "आधिच जिल्ह्यातील काही तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचार होत असल्याने बहुतेक शेतमळ्यान मध्ये रखवाली करणारे शेतमजुर हे संध्याकाळीच गावात किंवा शहरात येवून राहातात शेतमळे रात्रीच्या वेळी ओसपडतात त्यामुळे बिबट्याच्या भिती मुळे शेतकरी देखील रात्री चा वेळी शेतात जावू शकत नाही. त्यामुळे या भुरट्या चोराचे चांगले फावले आहे"

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे भुरट्या चोराचे चांगलेच फावले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे!                         
Previous Post Next Post