*प्रभाग *(०८)* मध्ये बिलाल मिलन न.पा. निवडणूक लढविणार ! ( बीलाल यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा (मानवत / प्रतिनिधी. {अनिल चव्हाण }—————————— मानवत नगर परिषद निवडणुकीची चाहूल लागताच प्रभाग क्रमांक आठ (०८) मध्ये नव्या उमेदवारांबाबत चर्चा रंगू लागली आहे. या प्रभागातून उद्योजक मोहम्मद बिलाल मोहम्मद युनुस बागवान (मिलन) हे इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे.सविस्तर वृत्त असे की, मानवत नगर परिषदेच्या निवणूकीचे बीगूल वाजले असून प्रभाग (०८) आठ मधून अनेक दिग्गज निवडणूक लढविणार असून या प्रभागात नवा चेहरा म्हणून यूवा नेते बिलाल मिलन हे शहरातील प्रस्थापित उद्योजक असून नवा मोंढा येथे त्यांच्या वडिलांची कापसाची मोठी जिनिंग आहे. ते अतिशय शांत, नम्र आणि सर्वांसोबत हसतमुख राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून शहरात ओळखले जातात. समाजातील सर्व घटकांशी त्यांचा चांगला सलोख्याचा संबंध असून, गरजवंतांच्या सुख दुःखात नेहमी अग्रेसर व धावून जाणारे म्हणून त्यांची प्रतिमा शहरात आहे.मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक (०८) आठमध्ये त्यांचा लोक समाज संपर्क दांडगा असल्याने निवडणूक लढविणे हे त्यांच्या दृष्टीने तुलनेने सोपे ठरेल, असे युवा मतदारासह या प्रभागातील नागरिकांचे मत आहे. अनेक नागरिकांनी “बिलाल मिलन यांना संधी मिळाली तर प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.दरम्यान, मानवत शिंदे गटाच्या वतीने बिलाल मिलन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बालाजी कुऱ्हाडे यांचाही प्रभाग क्रमांक आठमध्ये बिलाल मिलन यांच्या उमेदवारीवर विशेष भर असल्याचे नागरिकांतून चर्चा आहेत.बिलाल मिलन यांना पक्षाची उमेदवारी मिळाल्यास युवकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या प्रभागातून मोठ्या प्रमाणावर मतदान मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.**

*प्रभाग *(०८)*  मध्ये बिलाल मिलन न.पा. निवडणूक लढविणार ! ( बीलाल यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा                     
Previous Post Next Post