जामनेर मध्ये महर्षी वाल्मिक ऋषींची जयंती साजरी.... (जामनेर तालुका प्रतिनिधी अंबादास जाधव). आज रोजी 7 /10 /2025 रोजी जामनेर मध्ये महर्षी वाल्मिक ऋषींची जयंती साजरी करण्यात आली , जयंती मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून , साधनाताई महाजन, व चेतन दादा पाटील, शरद दादा पाटील चंदू अण्णा, मुकेश भाऊ सोनवणे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या मान्यवरांचे स्वागतासाठी श्री पंडित दादा जोहरे, टायगर आप्पा ,संतोष कोळी , दीपक जोहरे, विनोद कोळी , समाधान कडू जाधव , यांनी मान्यवरांचे फुलहार गुच्छ देऊन स्वागत केले , या कार्यक्रमांमध्ये ,चेतन दादांनी भाषण देत ,कोळी लोकांनी जनहितार्थ, सामाजिक कार्य व सोशल वर्क वाढवून ,समाजाला व इतर जाती धर्मातील लोकांना ,सोबत घेऊन आपला व आपल्या भारतवासीयांचा विकास साधावा, असा संदेश देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले, त्यानंतरमहर्षी वाल्मिक ऋषी मंदिरातून जयंती ला सुरुवात करण्यात आली, सर्व कोळी बांधवांनी आदिवासी बिरसा मुंडा कि जय हो महर्षी वाल्मिक ऋषींची जय हो ,अशा घोषणा देत ,आम्ही आदिवासी कोळी या गाण्यावरती आदिवासी नृत्य सादर करून महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहा मध्ये सुरुवात केली, महर्षी वाल्मिक ऋषी मंदिरातून थेट शिवाजी चौक जामनेर या ठिकाणी, मोठ्या उत्साहात वाजत गाजत शिवाजी चौकात जयंती आली ,महर्षी वाल्मिक जयंती मध्ये कोळी बांधवांनी मात्र शिस्तबद्ध पद्धतीने नाचत कुदत महर्षी वाल्मिक जयंती पार पाडली, त्यामुळे जामनेर शहरातील नागरिकांनी जयंती मधील कोळी बांधवांचे कौतुक केले,पत्रकार अंबादास संतोष जाधव

जामनेर मध्ये महर्षी वाल्मिक ऋषींची जयंती साजरी....           
Previous Post Next Post