*के.के.एम. महाविद्यालयात गांधी- सरदार पटेल जयंती निमित्त ग्रंथ व पोस्टर प्रदर्शन*. (मानवत परभणी विभागीय संपादक अनिल चव्हाण)————————————— के.के.एम. महाविद्यालयात गांधी जयंती व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विशेष ग्रंथ व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ग्रंथालय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे उद्घाटन के.के.एम. महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शारदा राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी गांधीजींच्या जीवनप्रवासावर त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या साहित्याचा अभ्यास करून त्यांच्या तत्त्वांवर चालत स्वतःला घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.या प्रसंगी के.के.एम. महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. सी. पी. व्यास, मराठी विभाग प्रमुख प्रा. विनायक जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पी. एस. लांडगे यांच्यासह महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. एन. चौबे उपस्थित होते. डॉ. चौबे यांनी आभार प्रदर्शन करून विद्यार्थ्यांनी ग्रंथ व पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के.के.एम. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील कर्मचारी श्री. शिवानंद बोचरे, मिटकरी सर, विठ्ठल गुंडाळे व योगेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गांना गांधीजी व सरदार पटेल यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची एक उत्तम संधी मिळाली.***
byMEDIA POLICE TIME
-
0