पहुर ते जांभूळ रस्त्याची झाली दूरवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ठेकेदाराचं दुर्लक्ष.. जामनेर तालुक्यातील पहुर ते जांभूळ रस्त्याचे काम गेल्या एक वर्षांपूर्वी खडीकरण झाले होते त्यानंतर त्या कामाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे आता पहुर पासून हिवरखेडा पिंपळगाव व कमानी तांडा ते जांभूळ पर्यंत रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, तसेच हिवरखेडा जवळ नाल्याच्या पाण्याने रस्ताच वाहून गेला त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहेत, त्या ठिकाणी रस्त्याच्या साईटवर दगड ठेवण्यात आले आहेत, हिवरखेडा व पिंपळगाव बु जवळ नाल्यावर चे पुल जुनेच आहेत, तसेच पहूर जवळ काही ठिकाणी रस्ता जुनाच आहे तसेच तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची कामे अपूर्ण राहिले आहे,तर काही ठिकाणी ५वर्ष होऊनही रस्त्याचे फलक लावले असून अजूनही रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत, पहूर पासून हिवरखेडा पिंपळगाव बु कमानी तांडा जांभूळ व वडगाव अशा सात गांवाचा रस्त्यांची दुरवस्था झाली आहेत, तरी वारंवार बातम्या प्रसिद्ध करुन देखील बांधकाम प्रशासनाला जाग येत नाही, तसेच रस्त्यांची वाट लागली तरी देखील गावागावातील पुढाकार दाखविणारे पुढाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहेत,रस्त्यांची कामे लवकर सुरू करावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे,

पहुर ते जांभूळ रस्त्याची झाली दूरवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ठेकेदाराचं दुर्लक्ष..                                                        
Previous Post Next Post