धुळेतील ड्रिस्स हर्बल कंपनीत श्री धन्वंतरी मूर्ती पूजन आणि भव्य महाप्रसाद (.वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.विपुल पाटील.)धुळे येथील ड्रिस्स हर्बल कंपनी व श्री धन्वंतरी धाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री धन्वंतरी मूर्तीचे पूजन व महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १७ वर्षांपासून आयुर्वेदिक औषध उत्पादन व विनामूल्य मधुमेह व व्यसनमुक्ती मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीने आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रकट केली आहे. श्री मधुकर शिवराम उदिकर, वालाबाई मधुकर उदिकर, सुनिल मधुकर उदिकर आणि मयुरी सुनिल उदिकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम स्नेहपूर्वक आयोजित करण्यात येत आहे. महाप्रसादाचा सवयीनंतर दुपारी १२ वाजता आगमन इथपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या दिवशी उपस्थितांमध्ये आरोग्य, समृद्धी व सुख-शांतीसाठी श्री धन्वंतरीचे आशीर्वाद मिळतील असे मानले जाते. दीपावलीच्या शुभमहोत्सवी वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित राहून तुम्हालाही आरोग्यदायी ऊर्जा मिळेल याची खात्री आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0