जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर- १ शाळेतील विद्यार्थ्यांना अश्रू अनावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेतील शिक्षकांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली. यामध्ये सौ सुवर्णा गाढवे ,सौ कविता सहाणे , सौ . योगिता जाधव यांची बदली बेल्हे शाळेतून अन्य शाळेत झाल्याने विद्यार्थ्यांना वाईट वाटले. गेले दहा ते बारा वर्षांपासून या शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांशी चांगली जवळीक निर्माण झाली होती आणि अचानक जिल्हाअंतर्गत बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भावना अनावर झाल्या. शाळेमध्ये मंथन, प्रज्ञाशोध तसेच मिशन बर्थडे, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीमध्ये चांगले काम केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम मुंजाळ उपाध्यक्ष वैशाली मटाले व सदस्य ईश्वर पिंगट, स्वाती कोकणे, प्रज्ञा शर्मा, सुवर्णा कदम, नसरीन पठाण ,प्रशांत औटी, शेखर पिंगट, गोरक्ष शिरतर व सर्वच सदस्य यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिरा बेलकर यांनी अनेक वर्षापासून मुख्याध्यापक पद सांभाळत चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला. शाळेमध्ये केलेल्या सन्मानाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी शालेय समितीचे आभार मानले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
byMEDIA POLICE TIME
-
0