**शालेय मुलींनी दिपावली सणा निमित्याचे औचित्य साधून विविध आकाराचे बनविले आकाश दिवे.*. *मानवत / अनिल चव्हाण.* *————————————**मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये दिपावली सणाचे औचित्य साधून कागदकामाच्या माध्यमातून शालेय मुलिंनी आज विद्यालयात क्राॅप काम म्हणून आकाश कंदिल व मातीकाम म्हणून विविध आकाराच्या पणत्या बनविल्या या सर्व विद्यार्थींना मार्गदर्शक तथा वर्ग शिक्षक संगीताताई थोरे , सुरेखाताई चंदाले यांनी मार्गदर्शन केले.**सविस्तर वृत्त असे की, येथील नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाले शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज विद्यालयातील इयत्ता ४ थी मधील मुलींनी सणासूदिचे औच्यित साधून क्राॅप व माती कामे करून विविध आकाराचे आकाश दिवे ( कंदील ) व पणत्या बनवून दाखविल्या या वेळी उत्कुृष्ट कार्य व कलाकूसर करणार्‍या शालेय मुलींचे कौतूक म्हणून संगीताताई थोरे मॅडम यांच्या हस्ते मुलींना प्रथम, द्वितिय, तृतिय, व प्रोत्साहन पर बक्षिस भेट देण्यात आले. यावेळी प्रमूख पाहुणे नाईक साहेब व मॅडम यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी बी.एस .गोंटे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यावेळी उपस्थित होते.*

शालेय मुलींनी दिपावली सणा निमित्याचे औचित्य साधून विविध आकाराचे बनविले आकाश दिवे.*.                                              
Previous Post Next Post