महाराष्ट्र शासनाचा श्री गुरू तेग बहादूर साहबजी शताब्दी समितीवर पत्रकार गुरुमुख सिंह बावरा यांची निवड.. समुद्रपूर / महाराष्ट्र शासनातर्फे 'हिंद की चादर' गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याच अनुषंगाने विदर्भात समिती तयार करण्यात आलेली आहे नागपूर मध्ये हा कार्यक्रम ६ डिसेंबरला होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीसाठी मुख्य मार्गदर्शक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ प्रदेश समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ प्रदेशाध्यक्ष गुरमीत सिंग जी खोखर यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली यामध्ये वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील पत्रकार गुरुमुख सिंह बावरा यांची विदर्भ प्रदेश सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे प्रमुख उपस्थितीत विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष परमजितसिंग भट्टी, सहसचिव गजेंद्र लोहिया, सचिव प्रीतपाल सिंग जी भाटिया आदी मान्यवर उपस्थित होतेश्री गुरु तेग बहादुर यांना ‘हिंदची चादर’ असेही म्हणतात. धर्म वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.या कार्यक्रमांमध्ये गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या देश आणि धर्मासाठी शहादत व बलिदान ची गाथा घराघरात पर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे हा कार्यक्रम सिख, सिकलगर, बंजारा, लबांना, मोहियल, सिंधी समाज बांधव एकत्रित पणे कार्यक्रम घेत आहे. यामुळेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली यातुन वर्धा जिल्ह्यातुन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गुरुमुख सिंह बावरा यांची निवड करण्यात आली आहेत.. त्यांचा निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सहकार नेते एडवोकेट सुधीर बाबू कोठारी , समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री . हिम्तबाबु चतुर, समुद्रपूर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र भाऊ कुकेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नगरपंचायत समुद्रपूरचे गटनेते श्री पिंटू भाऊ बादले, वर्धा जिल्हा माथाडी कामगार व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष महेंद्रजी शिरोडे , मेहेर बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी थोरात, उपाध्यक्ष अमोल सायंकार मनीष गांधी शांतीलालजी शांतीलाल गांधी, सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ तुळणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गजानन जी दुर्गे समुद्रपूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विनोदी हिवंज शालिक रावजी वैद्य रामभाऊजी चौधरी अमित लाजुरकर इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंद केले
byMEDIA POLICE TIME
-
0