आनंदी ठेवा मनाला… सुटू द्या हृदयाला!माधवबाग व डॉ. सुशांत शशिकांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय तपासणी मेगा कॅम्प... (विरोदा किरण पाटील प्रतिनिधी )फैजपूर ता. यावल, जि. जळगाव) :माधवबाग आणि डॉ. सुशांत शशिकांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने “आनंदी ठेऊ मनाला, सुटू द्या हृदयाला” या संकल्पनेतून मोफत हृदय तपासणी व आरोग्य जागरुकता मेगा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.हा कॅम्प १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, फैजपूर येथे होणार आहे.कॅम्पमध्ये दमा, चक्कर येणे, मधुमेह, ब्लडप्रेशर, छातीत वेदना, वजन वाढणे, पायात सूज येणे, थकवा किंवा हृदयविकारासंबंधी त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.या कॅम्पमध्ये स्ट्रेस फ्री आणि डिप्रेशन फ्री आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन माधवबागचे अनुभवी डॉक्टर देणार आहेत.तपासणी अंतर्गत –ईसीजीहार्ट रेटबी.पी.हाइट-वेटएस.पी.ओ.२टोटल ब्लड शुगरबॉडी मास इंडेक्स (BMI)वैद्यकीय सल्लाएकूण तपासणी खर्च ₹1000 असून, विशेष सवलतीत फक्त ₹299/- मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.रुग्णांनी आपल्या आरोग्य तपासणीसाठी नाव नोंदवून मोफत अपॉइंटमेंट घ्यावी, अcसे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क: 98604 31004

आनंदी ठेवा मनाला… सुटू द्या हृदयाला!माधवबाग व डॉ. सुशांत शशिकांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय तपासणी मेगा कॅम्प...                                                        
Previous Post Next Post