*संकटाच्या काळात राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - विनोद जाधव* महाराष्ट्रातील महायुती सरकार हे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून राज्यात अलीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹३१,६२८ कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. बळीराजाला या संकटाच्या काळात मदतीचा हात देऊन एकप्रकारे पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित महायुती सरकार करत आहे.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव विनोद पाटील जाधव यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील,दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले. तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जिल्हा प्रशासन महसूल-पंचनामा अहवालांच्या आधारे पात्र लाभार्थी निश्चित केले जातील. ग्रामसेवक आणि तलाठींच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करून मदत थेट खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. राज्यातील सरकार हे गोरगरीब कष्टकरी,बळीराजाच्या प्रश्नांना न्याय देणार सरकार आहे या निर्णयाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे असे जाधव म्हणाले.
byMEDIA POLICE TIME
-
0