अक्कलकुवा येथे बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिक दाखल गुन्ह्यात शासनाची बाजू मांडण्यासाठी शहादा वकील संघाचे सदस्य ॲड.राजेश कुलकर्णी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. ((प्रा. डी. सी. पाटील, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) शहादा (प्रतिनिधी) : अक्कलकुवा येथील बेकादेशीर वास्तव्य असलेल्या विदेशी नागरिक आणि वास्तव्यास असलेल्या संस्थेच्या विरोधातील दाखल गुन्हा प्रकरणी राज्य शासनाच्या कायदा व न्याय विभागाने शहादा येथील निष्णात कायदेपंडित ॲड.राजेश रमेश कुलकर्णी यांची “विशेष सरकारी वकील” (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अतिरिक्त सत्र न्यायालयात अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पोलीस ठाणे येथे नोंदविलेल्या प्रलंबित गुन्हा प्रकरणाच्या सुनावणीसाठी करण्यात आली आहे. अक्कलकुवा येथील जामिया मदरसा येथे येमेन येथील विदेशी नागरिक बेकादेशीर वास्तव्य करत होते. त्या संदर्भात गुन्हा क्रमांक 30/2025 अन्वये संबंधित विदेशी नागरिक व जामिया मदरसाचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी शहादा येथील प्रसिद्ध फौजदारी कायदेतज्ज्ञ ॲड. राजेश कुलकर्णी यांची नियूक्ती कायदा व न्याय विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लॉ ऑफिसर्स (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984 च्या नियम 44अन्वये केलेली आहे.सदरची नियूक्तीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील वकिलांकडून तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातून शहादा वकील संघाचे सदस्य ॲड.राजेश कुलकर्णी यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अक्कलकुवा येथे बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिक दाखल गुन्ह्यात शासनाची बाजू मांडण्यासाठी शहादा वकील संघाचे सदस्य ॲड.राजेश कुलकर्णी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती.         
Previous Post Next Post