**नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात बाल दिन ऊत्साहात साजरा. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयामध्ये आज बालक दिन उत्साहात साजरा. नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानवत येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लाड सर ज्ञानेश्वर कौसाईतकर सर माणिकराव शिसोदे यांच्या शुभहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच बालकांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लाड कुसुम कनकुटे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सदाशिव होगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर झोल दिगंबर रोकडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.***

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात बाल दिन ऊत्साहात साजरा.                                  
Previous Post Next Post