कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी हिंगणघाट शहरातील जनतेने सहकार्य करावे - डॉ.आशिष लांडे , वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट.... दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ ते ०२ डिसेंबर २०२५ पर्यंत हिंगणघाट शहरात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ,जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले,सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा. डॉ.राज पराडकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक,यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे . यामध्ये एकूण ५५ टीम कार्य कार्यकरणार असून ११ पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहे.समाजातील निदान झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण निरंक असणे, सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग दूर करण्याचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे व समाजामध्ये जनजागृती करणे हा मोहीमेचा उद्देश आहे. मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असून याकरता निवडलेल्या टीमचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या सर्वेक्षकांकडून आपली तपासणी करून घ्यावी व सदर मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन हिंगणघाट शहरातील जनतेला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे यांनी केले. मोहीम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशाताई, स्वयंसेवक, सहकार्य करत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0