हिंगणघाट परिसरात गुन्हे प्रकटीकरणाची अवैध धंद्यावर कारवाई.. सपोनि पद्ममाकर मुंडे, सपोनि दिपक वानखडे सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात मा. वरीष्ठांचे आदेशाने अवैध धंदयावर कार्यवाही करीता रवाना असतांना मुखबीर द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, संत ज्ञानेष्वर वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा जय चुटे व त्याचा मित्र प्रज्वल थुल हे दोघे काळया-लाल रंगाची बजाज पल्सर 220 मोटार सायकल क्र. एमएच 31 डीडब्लू 5017 ने गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देषाने बाळगुण विक्री करीता शहालगंडी मंदीर रोड, हिंगणघाट कडून जाम रोडने घेवून येत असून जय चुटे याने काळया रंगाची फुल बाहयाची टि-षर्ट व फिक्कट काळया रंगाचा जिन्स घातलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. श्री. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट व मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. यांना देवून त्याचे आदेशाने शहालगंडी मंदीर रोड, हिंगणघाट येथे जावून सापळा रचून नाकेबंदी करून सदर दोन इसमांस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव, पत्ता, विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) जय वसंतराव चुटे वय 21 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट जि, वर्धा 2) प्रज्योत विरसेन थुल वय 23 वर्ष रा. संत चोखोबा वार्ड़ हिंगणघाट वर्धा असे सांगितले. पंचासमक्ष त्याची कायदेशीर रित्या झडती घेतली असता त्याचेजवळ असलेल्या बँगमध्ये 1) एका पांढ-या रंगाचे प्लास्टिक पन्न्नीमधील हिरवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळया व बिया असलेली ओलसर, वनस्पती गांजा नावाचा अंमली पदार्थाचे चुंगडी व पन्नीसह वजन केले असता त्याचे एकुण वजन - 424 ग्रॅम किंमत 8, 220 रू 2) एक जुनी वापरती काळया-लाल रंगाची बजाज 220 पल्सर मोटार सायकल क्र. एमएच 31 डीडब्लू 5017 जिचा चेचीस क्र. MD2DHDKZZUCH66784 किंमत 1,00,000 रू 3) दोन जुने वापरते अॅन्ड्रॉईंड मोबाईल किंमत 20,000 रू व स्कुल बँग 200 रू असा जू.किं. असा जु.किं. 1,28,400 रू चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द एनडीपीएस अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक सा. व मा. पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे यांचे मार्गदर्शनात सपोनि पद्ममाकर मुंडे सा., सपोनि दिपक वानखडे सा. डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोना/112 निलेश सुर्यवंशी, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी कार्यवाही केली. सदर गुन्हयांच पुढील तपास पोउपनि हरीहर सोनकुसरे पो.स्टे हिंगणघाट करत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0