*विवेकानंद माध्यमिक विद्यालय, भद्रावती येथे नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा*. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.29:- भद्रावती येये पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यालयात शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडलेल्या विविध बॅचेसचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे,*24 वर्षांपूर्वी (सन 2002) च्या बॅचच्या विद्यार्थिनींची उपस्थिती..!*या बॅचच्या,*वैशाली कापटे, विद्या वांढरे, योगिता मांढरे, ललिता जिल्लेवार*तसेच, जुन्या बॅच पैकीच्या *मंगला सतई, वैशाली बोदे, जयश्री पिंपळकर, पल्लवी ठक*या विद्यार्थिनींनी मेळाव्याला उपस्थित राहून, सक्रिय सहभाग घेऊन आणि आत्ता शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून मेळाव्याची शोभा वाढविली.*मुख्याध्यापिका सौ. कल्पना बांदूरकर*यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात *सहाय्यक शिक्षक दयाकर मग्गीडवार, सौ. आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे, सौ. मेघा ताजने, सौ. शीतल जीवने, क. लिपिक विनोद गावंडे, आयसीटी प्रशिक्षक प्रमोद लांडगे, शिक्षकेत्तर कर्मचारी रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे*आदींनी मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0