रामदास बबन राऊत निर्माता दिग्दर्शक लेखक तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर. दिनांक 7/11/2025 रोजी सांस्कृतिक लोककला महोत्सव बेल्ला या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी माझी कैलासवासी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार साठी निवड झाली असून मी प्रथम या कार्यक्रमाचे, सर्वेसर्वा माननीय वसंत अण्णा जगताप व त्यांचे सहकारी तसेच श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था व सर्व सन्माननीय संचालक तसेच साईकृपा मल्टीस्टेट पतसंस्था वैष्णवी मल्टीस्टेट पतसंस्था या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमांमध्ये मला सन्मानित करण्यात येणार आहे तरी बहुसंख्य प्रेक्षक रशिक मायबाप व हितचिंतक यांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती करत आहे तसेच स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर अण्णा यांच्या आठवणी बद्दल सांगायचं झालं तर सन 1985 दरम्यान मी चार ते पाच गीते तयार करून अण्णांना भेटायला बेल्हे या ठिकाणी गेलो असता अण्णांनी तब्येतीच्या कारणावरून मला सांगितलं की आता वयानुसार जास्त मी गाणी गात नाही तरीपण एखाद्या गीत घेण्याचा प्रयत्न करीन त्यांचे दर्शन घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी मला जो आशीर्वाद दिला की बाळ एक दिवस तू नक्कीच चांगला कलाकार होशील या आशीर्वादाच्या जोरावर मी आज पर्यंत या ठिकाणी टिकून आहे अशा थोर आणि जेष्ठ कलावंताचा नावाने मला जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याने मन अगदी भारावून गेले खरोखरच आधी कधी असं स्वप्नतही वाटलं नव्हतं की आपण इथपर्यंत जाऊ परंतु माझ्या कलेची कदर जनसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वच रसिक मायबापांनी प्रेमाचा आशीर्वाद मला दिला आणि आज हा आनंदाचा क्षण तुमच्या सर्वांच्या साक्षीने सादर करत असताना मनाला खूप समाधान वाटत आहे हा पुरस्कार देणे कामी माननीय वसंत अण्णा जगताप सर यांनी माझी निवड केली खरोखर अशा थोर व्यक्तीबद्दल किती बोलाव तेवढ थोडंच आहे असो तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून गेली पाच वर्षापासून अविरत सेवा करत असून विविध सप्तकाला समाज प्रबोधन या माध्यमातून करीत आलो आहे तेही पुढे करीत राहील असा विश्वास वाटतो त्यासाठी आपण रसिक मायबापांनी दिलेली शाब्बासकीची थाप ही कलाकारासाठी फार मोठी ताकद असते आणि ती ताकद जपून वापरण्याचं काम यापुढील काळात मी करणार आहे अण्णांनी पुरस्कार देऊन माझ्यावरील जबाबदारी वाढवली आहे पुरस्कार हा घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा पेपरमध्ये छापण्यासाठी नसून त्यांच्याबरोबर कलीची उंची वाढवण्यासाठी दिलेला असतो निश्चितच या संधीचं सोनं करण्याचं काम या पुढच्या काळात मी करील असा पुन्हा एकदा विश्वास देतो आणि मला पुरस्कार देऊन सन्मानित केलं या सर्वच संस्था पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनीच जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी पुन्हा एकदा विनम्र विनंती करतो कळावे आपला विनम्र तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक लेखक रामदाजी राऊत सर शिरूर
byMEDIA POLICE TIME
-
0