देवळी (ता. देवळी) —देवळी शहरातील विविध नागरी समस्या, घरकुल योजना आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे शंकर अंबादास केवदे यांनी प्रभाग क्रमांक ७ (वॉर्ड क्र. १६) येथून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निश्चय केला आहे.श्री. केवदे यांनी गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे अनेक निवेदने सादर करून घरकुल योजना, मूलभूत सुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.श्री. केवदे म्हणाले, “माझं ध्येय सत्तेचं नव्हे, तर आपल्या वॉर्डातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांवर ठोस उपाय करणं आहे. देवळीच्या विकासासाठी मी नेहमीच जनतेसोबत राहीन.”जनतेच्या आग्रहावरून घेतलेल्या या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं असून, अनेकांनी त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे.आगामी काळात श्री. केवदे आपल्या प्रभागाच्या विकास आराखड्याची घोषणा करणार आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0