*प्रभाग ११ मधून पूजा श्रीकांत देशमूख यांची उमेदवारी दाखल.*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————————आज मानवत नगर परिषद प्रभाग क्रमांक ११ अ मधुन सौ. पुजा श्रीकांत देशमुख यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत साधेपणाने दाखल करण्यात आला आहे.यावेळी निवडणूक निर्णयअधिकारी तथा तहसिलदार पांडूरंग माचेवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी संजयजी खिल्लारे व कर्मचारी उपस्थित होते.सविस्तर वृत्त असे की,मानवत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५/२६ मानवत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून देशमूख यांना दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे अशी विनंती यावेळी मतदारांना करण्यात आली. देशमूख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ज्या महापुरुषांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी अर्पण केले त्या सर्व महापुरुषांना वंदन केले. प्रभागातील सर्व कामे करण्यास मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही यावेळी दिली या वेळी प्रेरणाताई वरपूडकर यांच्यासह देशमूख परिवारातील सदस्य उपस्थित होते...***
byMEDIA POLICE TIME
-
0