समुद्रपुर दि12 डिसेंबर समुद्रपूर तालुक्यातील करुळ पवनगाव शिवारात वाघाचा हल्ला गाय व वासरू ठार .. करूळपवन गावात काल रात्रीच्या सुमारास गाय व वासरू मारल्याची घटना सकाळी शेतावर गेले असता उघडकीस आली विठोबा चाहदकर या शेतकऱ्यांचे शेतात गाय व वासरू बांधले असता वाघाने हल्ला केल्यामुळे गाय वासरू हे जागीच ठार झाले त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावातील शेतकऱ्यांमध्ये व मजूर वर्गामध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे मनवर शेख समुद्रपूर
byमीडीया पोलीस टाईम
-
0