*उघड्या घरातून 20 तोळे सोने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास उत्तर प्रदेश येथून शीताफिने अटक करून चोरी केलेला 100% मुद्देमाल हस्तगत केले बाबत* (यासीन तडवी यावल मीडीया तालुका पोलीस टाईम विभागीय संपादक) ➡️) पोलीस ठाणे - सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई➡️ गुन्हा नोंद क्र व कलम - 703/2025 कलम 305 (अ) भा.न्या.सं.➡️ फिर्यादीचे नाव :- श्री युसुफ इब्राहीम कासमानी, वय - 53 वर्षे ➡️ गुन्हा घडला दिं.व वेळ.:- दिनांक 29/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ते 17.30 वाजताचे दरम्यान➡️ गुन्हा दाखल दि. वेळ. दिनांक 30/11/2025 रोजी 00.57 वा➡️ घटनास्थळ:- आफीया हाईट्स, 11 वा माळा, रुम नं. 1101, डिमटिमकर रोड, मुंबई 08.➡️ *थोडक्यात हकीकत* . दिनांक 29/11/2025 रोजी 10.15 वा. ते 17.30 वा. च्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहते घरातील इंटीरीयरचे काम चालू असताना त्यांचे घरातील सर्व दरवाजे उघडे होते. त्या दरम्यान त्यांचे बेडरुमच्या लाकडी कपाटात ठेवलेले 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार (किं.अं. 24,00,000/- रु) फिर्यादी यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणुन नमुद अनोळखी इसमाविरोधात गु.र.क्र. 703/25 कलम 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.➡️ *चोरी झालेली मालमत्ता -* 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार (किं.अं. 24,00,000/- रु) ( *संपूर्ण मालमत्ता हस्तगत* )➡️ *तपास* - नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पो उप नि प्रशांत नेरकर व पथक हे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये फिर्यादीकडे कामाला आलेला एक इसम हा संशईतरित्या जाताना दिसून आल्याने त्याची माहिती घेतली असता त्यांचा मोबाईल नंबर बंद मिळून आला व त्याचे आधार कार्ड बनावट असल्याचे समजलेने त्याचे राहते परिसरात जाऊन शोध घेतला असता सदर इसमाने त्याचे रूम मधील सर्व सामान विकून तो गावी पळून गेल्याची माहिती मिळवून आली. सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन तांत्रिक माहिती आधारे पो उप नि प्रशांत नेरकर व पथक हे तात्काळ जिल्हा बांदा, यू पी येथे रवाना झाले. व आरोपीत इसमाच्या गावात जाऊन गुप्त बातमीदार याचे मार्फत चौकशी केली असता आरोपीत इसम तेथे आला नसल्याबाबत माहिती मिळून आली.आरोपीत इसम हा सराईत आरोपी असल्याने त्याने मोबाईल चालू केला नाही व त्याचे राहण्याचे ठिकाण देखील सतत बदलत असल्याने पथकाने सलग 07 दिवस 04 राज्यांमध्ये त्याचा पाठलाग करून आज रोजी दि.08/12/25 गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती आधारे मतोंध - कानपूर हायवे वर पहाटे 4 वा चे सुमारास आरोपी जात असलेल्या खाजगी बस ला थांबविली असता आरोपीत इसमाने बसच्या खिडकी मधून उडी मारून झाडाझुडपात पळून जात असताना त्यास शीताफिने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली व चोरी केलेला संपूर्ण 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.➡️ *अटक आरोपी -* इर्शाद कल्लू खान, वय 22 वर्षे, काम पेंटर, रा ठी - हनुमान मंदिराजवळ, रोड नंबर 04, मंडला, मानखुर्द, मुंबई.गाव चा पत्ता- गाव गोयरा मुगली, ठाणा मतोंध, जी बांदा. राज्य- यू पी.( गुन्ह्याभिलेख निरंक )▶️ *तपास मार्गदर्शन :-* 1) मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मुंबई.2) मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंगरी विभाग, मुंबई3) मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई➡️ *तपासी पथक* - पो उप नि प्रशांत नेरकर, (DO)पो ह तडवी, पो शी घाडगे, पो शी कोलपुसे, पो शी शेवरे, पो शी डावरे, पो शी चौधरी. ( तांत्रिक मदत पो ह सचिन पाटील ) माहितीस्तव सविनय सादर [रईस शेख] वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई
byमीडीया पोलीस टाईम
-
0