मारहाण, धमक्या, हल्ले… पण अटक नाही : जळगावात कायद्याची थट्टा**अल्पसंख्यांक असुरक्षित, आरोपी सुरक्षित : जळगावची भयावह स्थिती* (*महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक शेख शरीफ* ) जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसांत अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांवर घडलेल्या तीन गंभीर, हिंसक व कायद्याला आव्हान देणाऱ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणेची पूर्ण निष्क्रियता उघड झाली आहे. अन्याय झालेल्यांना न्याय देण्याऐवजी आरोपींना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असून त्यामुळे अल्पसंख्यांक समाजात तीव्र असंतोष व संतापाची भावना निर्माण झाली आहे.*घटना क्रमांक १ – जामनेर (१७ जानेवारी):*मॉब लिंचिंग प्रकरणातील मूळ फिर्यादी रहीम खान सुलेमान खान यांचे वडील यांना डिफॉल्ट बेलवर सुटलेल्या आरोपींनी रस्त्यात अडवून “आमच्या जामिनाला विरोध करू नकोस, नाहीतर तुझाही तुझ्या मुलासारखा अंत करू” अशी जिवे मारण्याची धमकी दिली.या गंभीर धमकीप्रकरणी जामनेर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून एकाही आरोपीस अटक केलेली नाही. हे कायद्याची थट्टा नाही तर काय?*घटना क्रमांक २ – निंभोरा (१८ जानेवारी):*फैजपूर येथील साबीर शेख व त्याचा अल्पवयीन पुतण्या यांना “गोमांस असल्याच्या संशयावरून” काही समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली. एवढ्यावर न थांबता या हिंसाचाराचे व्हिडिओ शूट करून पसरवले, समाजात दहशत निर्माण केली.धक्कादायक बाब म्हणजे मारहाण झालेल्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला, तर प्रत्यक्ष हल्लेखोरांवर २१ जानेवारीपर्यंत एकही गुन्हा नोंदवलेला नाही. ही कारवाई नसून अन्यायाला कायदेशीर कवच देण्याचा प्रकार आहे.*घटना क्रमांक ३ – रावेर (२० जानेवारी):*कोतवालवाडा परिसरातील मशिदीचे धर्मगुरू अक्रम खान अजगर खान यांच्यावर रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.अशा गंभीर हल्ल्यातही रावेर पोलीस स्टेशन मध्ये केवळ भारतीय न्याय संहिता कलम 115(2) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपी मोकाट फिरत आहेत.या तिन्ही घटनांबाबत जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक, जळगाव यांना स्वतंत्र व संयुक्त स्वरूपात निवेदने देण्यात आलेली आहेत.तरीही अद्याप ठोस कारवाई, अटक, गुन्हे वाढवणे किंवा पीडितांना संरक्षण दिलेले नाही.*एकता संघटनेतर्फे इशारा*जर आठ दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांमध्येआरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक,पीडितांना संरक्षण,व पोलीस कारवाईतील दिरंगाईची चौकशीझाली नाही, तर जळगाव जिल्ह्यात तीव्र, लोकशाही मार्गाने परंतु आक्रमक स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील. अल्पसंख्यांक समाज शांत आहे, कमकुवत नाही.न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. असे वक्तव्य एकता संघटनेचे फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, नदीम मलिक व मजहर पठाण यांनी एका पत्रका द्वारे केला आहे*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*फारुक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, जकी पटेल, सलीम इनामदार, एडवोकेट अल्ताफ मिर्झा, अनवर सिकलगर , मजहर पठाण, एडवोकेट आवेश शेख, युसुफ पठाण, मुजाहिद खान, आरिफ देशमुख, मुस्तकीम शेख, सय्यद फराद, अख्तर शेख, वसीम शेख, रज्जाक पटेल, अरमान पटेल , वसीम मुलतानी आदींचा समावेश होता.
byमीडीया पोलीस टाईम
-
0