पाडळसे महाकालेश्वर मित्र मंडळ आयोजित पोलिस पाटील चषक 2025: रोनक 11संघ ठरला विजेते, तर 'मातृभूमी बॉईज' उपविजेता संघ ठरला तसेच या मालिकेत 1. उत्कृष्ट फलंदाज - विकी कोळी (मातृभूमी बॉईज)2. उत्कृष्ट गोलंदाज - कुंदन कोळी (मातृभूमी बॉईज)3. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू - देवा कोळी ( मातृभूमी बॉईज)(पाडळसे ता. यावल ): पाडळसे गावात नुकत्याच पार पडलेल्या पोलिस पाटिल चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचा थरार अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत 'रोनक 11' संघाने मंदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर ' मातृभूमी बॉईज ' संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या क्रिकेट स्पर्धेत पाडळसे सरपंच पदी अँड सुरज पाटील यांच्याकडून खेळामध्ये खेळाडूंनी कशी खेळ भावना दाखवावी ही समोर आली कारण या स्पर्धेत 10 विकेट होत्या तर कुंदन कोळी यांच्या 9 विकेट होत्या पण त्यांच्या मते नऊ विकेट होत्या त्यांच्या मते स्पर्धेतील बेस्ट गोलंदाज कुंदन कोळी च या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू हा देवा कोळीच आहे हे सांगितले व दोघं ट्रॉफी त्यांनी त्यांच्यासोबत शेअर केल्या याबद्दल अँड सुरज कोळी यांचे सर्वांकडून कौतुक झाले . ग्रामस्थांमध्ये एकता आणि खेळाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन श्री सुरेश वामन खैरनार पोलिस पाटिल पाडळसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत एकूण 7 संघांनी आपला सहभाग नोंदवला परंतु रोनक 11आणि मातृभूमी बॉईज या दोन संघात अंतिम सामना रंगला. अंतिम सामन्यात रोनक11या संघाने मातृभूमी बॉईज संघावर मात करत पोलीस पाटील चषकावर आपले नाव कोरले. विजेता ठरलेल्या रोनक11 संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपविजेते ठरलेल्या मातृभूमी बॉईज संघानेही आपल्या दमदार खेळाने उपस्थितांची मने जिंकली. पोलीस पाटील चषकाच्या समारोप समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पोलीस पाटील, सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. या पोलीस पाटील चषकात अँड सूरज पाटील कुंदन कोळी, खेमचंद कोळी, आझाद पठाण, दत्तू कोळी, प्रशांत पाटिल, मोसिन खान , इरफान, प्रमोद तायडे यांनी पंचांची भूमिका बजावली तसेच योग्य नियोजन करून यशस्वी आयोजनामुळे पाडळसे गावातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0