अँड .दत्ता निकम यांनी दिलेल्या पुस्तक दालनाचे उद्घाटन ! छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद दिनांक २० नोव्हेंबर 2025 ; ज्येष्ठविधीज्ञ अँड .दत्ता निकम (नाशिक) यांनी दान केलेल्या कायद्याच्या पुस्तकांचे दालन मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या ग्रंथालयात ज्येष्ठविधीज्ञ रामनाथ चौबे , अँड .निशिगंधा चोबे , अँड बाबासाहेब वावळकर यांच्या हस्ते खुले करण्यात आले. कामगार विषयक सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालांच्या संकलनाचे पुस्तके या दालनात उपलब्ध आहेत. याबाबत असे की, संपूर्ण आयुष्यभर कामगारांसाठी नाशिक येथे वकिली करणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ अँड. दत्ता निकम यांची संपूर्ण आयुष्यभराची कमाई असलेली कायद्याची पुस्तके मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन साठी दान केले होते . आज मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कार्यालयात उद्घाटन समारंभपूर्वक ज्येष्ठविधीज्ञ रामनाथ चौबे , अँड .निशिगंधा चोबे , अँड बाबासाहेब वावळकर यांच्या हस्ते पुस्तकांचे दालन सभासदांसाठी खुले करण्यात आले. ज्या वकिलांकडे स्वतःचे ग्रंथालय नाही अशा नवोदित वकिलांसाठी हे दालन अत्यंत उपयोगी ठरेल, पुस्तके माणसाला समृद्ध करतात संपन्न करतात, कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या वकिल आणि कामगार चिरकाल अँड .दत्ता निकम यांचे आभारी राहतील अशा शब्दात ज्येष्ठ विधीज्ञ अँड. रामनाथ चोबे यांनी उद्घाटन केले. तर अँड . निशिगंधा चोबे म्हणाल्या की, ऑनलाइनच्या जमान्यात देखील पुस्तकांचे महत्त्व कमी होणार नाही, आजही ऑनलाईन पेक्षा पुस्तके वाचणे अधिक आनंददायी आणि समाधानी आहे, ऑनलाइन मुळे डोळे खराब होतात आणि पुस्तके वाचल्याने मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहते म्हणून पुस्तक वाचण्यास प्राधान्य द्यावे असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ असोसिएशन चे मुख्य निवडणूक अधिकारी अँड . जी एम जाधव यांनी देखील अँड . दत्ता निकम यांच्या कार्याचा गौरव करीत असोसिएशन तर्फे त्यांना प्रशस्तीपत्र , आभाराचे पत्र तातडीने पाठविण्यात यावे अशी सूचना देखील केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक असोसिएशनचे सेक्रेटरी अँड अभय टाकसाळ यांनी केले. यावेळी असोसिएशनचे सहाय्यक निवडणूक अधिकारी अँड.बी आर सोनटक्के पाटील, अँड. अनंत कुमार गुंगे पाटील , ज्येष्ठविधीज्ञ अँड जे एस भोवते , अँड . यतिन ठोले, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सागरदास मोरे, उपाध्यक्ष अँड. बलराम सुकासे, कोषाध्यक्ष अँड. अनिल सुरवसे, सदस्य अँड आनंद कांबळे, अँड. आशिष देवरे , अँड. हरिश्चंद्र ठोके, अँड सुनील चौतमल, अँड संकेत जोशी , अँड . राजेश खंडेलवाल, अँड. एस आर बोधडे, अँड आर बी ढाकणे, अँड दत्ता ढोबळे, अँड अशोक मोरे, अँड एस के इंगोले, अँड आर के ढगे पाटील, अँड. शंकरराव तारू, अँड . पी एस तांदूळजे, अँड . शिरीष जाधव, अँड राहुल गंगावणे, , अँड. टी टी खानसरे अँड .विजय जाधव अँड . तायडे,, अँड. लता मोरे बामणे, अँड.वसंत शिंदे, अँड. सचिन गंडले, अँड. नानासाहेब घोडे, अँड.महादेव शिंदे अँड . लक्ष्मण बोरुडे, अँड .अय्याज शेख, अँड . उमेश इंगळे, अँड रुपेश बर्डे, यांच्यासह मोठ्या संख्येने वकिलांची उपस्थिती होती.

अँड .दत्ता निकम यांनी दिलेल्या पुस्तक  दालनाचे उद्घाटन !                                                                                
Previous Post Next Post