मोहमांडली नवी (ता. रावेर) येथे अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा दिन उत्साहात साजरा* मोहमांडली नवी, ता. रावेर | दि. 24 डिसेंबर राष्ट्रीय पेसा दिनानिमित्त पेसा कायदा १९९६ बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या अनुसूचित क्षेत्रातील गावांना स्वशासन व ग्रामसभेचे अधिकार अधोरेखित करणारा पेसा दिन मोहमांडली नवी (ता. रावेर) येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती रॅली काढली. रॅलीदरम्यान “पेसा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”, “ग्रामसभा मजबूत तर लोकशाही सशक्त” अशा घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील, उपशिक्षक विनोद पाचपोळे, तसेच मोहमांडली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक महेंद्र पवार, सरपंच रजिया तडवी, उपसरपंच कुर्बान तडवी, ग्रामपंचायत सदस्य शाहबीर तडवी व इतर सदस्य उपस्थित होते.तसेच अनुसूचित जमाती क्षेत्रातील ग्रामपंचायतनिहाय पेसा गाव सनियंत्रण अधिकारी अजित जमादार यांनी उपस्थित राहून पेसा कायद्याचे महत्त्व विशद केले. पेसा कायद्यामुळे ग्रामसभेला मिळालेले अधिकार, जल-जंगल-जमिनीवरील हक्क तसेच आदिवासी स्वशासनाची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अनुसूचित जमाती क्षेत्रात पेसा कायद्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

मोहमांडली नवी (ता. रावेर) येथे अनुसूचित जमाती क्षेत्रातील पेसा दिन उत्साहात साजरा*                                                   
Previous Post Next Post