*"गो " पालनाने वाढते घरातील सुख संपन्नता..ऐका चोपड्यात भव्य पाच दिवसीय कथा..१३ वर्षे अन्नाशिवाय जगणारे प.पू. संत जगतगुरु श्रीश्री १००८ जगदीश महाराजांचेही शेवटच्या दिवशी प्रवचन*. (चोपडा दि.१६ ( संजीव शिरसाठ)देशभर गोमातेची हत्या व कत्तली दिवसेंदिवसे वाढत असून ती कमी करून गो मातेचे संरक्षण करण्यासाठी देशभर "गो सन्मान अभियान" राबविण्यात येत आहे याचा भाग म्हणून चोपडा तालुक्यात गोमातेचा सन्मान वाढावा याकरिता पाच दिवसीय भव्य दिव्य गो कृपा कथेचे आयोजन करण्यात आले या कथेद्वारे" गो "माते विषयी जनजागृती करून राष्ट्रीय दर्जा शासनाने द्यावा अशी मागणी गोसेवक करीत आहेत.ही कथा दि.२१/१२/२०२५ते २५/१२/२०२५ दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा येथे दुपारी ०२ ते ०५ वाजे दरम्यान होत असून कथेच्या पाचव्या दिवशी जगतगुरु राष्ट्रीय युवा संत प.पू.श्रीश्री.१००८जगदिशजी महाराज यांचे धडाकेबाज प्रवचन श्रोत्यांना ऐकावयास मिळणार आहे.तरी कथेचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेतून आयोजकांनी केले आहे.यावेळी ज्ञानेश्वर पाटील, के.डी. चौधरी, सतीश पाटील, नंदलाल पाटील, शरद मोरे, राजेंद्र गणपत चौधरी, रवींद्र धुडकू चौधरी, देवकांत चौधरी, लखन भैय्या आदी उपस्थित होते.हिंदुस्थानात गाय वाचेल तर देश वाचेल अन्यथा अनेक संकटे भविष्य कोसळण्याची शक्यता आहे. आपल्या हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला असून तिच्या पायात 33 कोटी देव असल्याचे आजही आपण मान्य करतो अशा मातेची कत्तल होणे थांबले पाहिजे व गाईला शासनाने अनन्य साधारण महत्व दिले पाहिजे तिचा गौरव झाला पाहिजे अशी भूमिका करोडो सेवकांचे असून गाय पाळण्याचे किती फायदे असतात हे जनतेला कळले पाहिजे याकरता चार दिवस पूज्य सांध्वी डॉक्टर कपिला गोपाल सरस्वती दिदींचे सुश्राव कथेचे आयोजन असून गो कृपा पासून श्रावण बाळासारखी संतान प्राप्ती, गर्भस्थ बाळाला चांगले संस्कार देणे ,घरातील कलह वादविवाद व कलेश कसे मिटतील? अडकलेला पैसा व धन कसे प्राप्त होईल, घरात बरकत कशी राहील तसेच कर्जापासून कशी मुक्ती मिळेल? व्यापार व उद्योग धंद्यात कशी भरभराट होईल ?यासह सर्व समस्यांचे समाधान व बिन खर्चिक महत्त्वपूर्ण उपाय त्या सांगणार आहेत तसेच शेवटच्या दिवशी म्हणजेच 25/ 12/25 रोजी 31 वर्षांपासून अन्यत्याग करणारे जगतगुरुचार्य महाराज श्री श्री 1008 परमपूज्य जगदीश जी महाराज यांच्या अमृतवाणीतून गोमाते विषयी अध्यात्मिक माहितीही श्रोत्यांना ऐकवास मिळणार आहे. या महाराजांनी सन 2012 मध्ये राजे महाराणा प्रताप यांच्या यांच्या हल्दीघाट येथून गो मातेच्या संरक्षणार्थ अभियान सुरू केले आहे . जवळपास 13 वर्षापासून ही यात्रा सुरू असून दि. 27 एप्रिल 2026 रोजी देशभर "गो सन्मान अभियान" राबविण्यात येणार आहे. हे अभियान देशभर चार टप्प्यात राबविण्यात येणार असून दिनांक 26 जानेवारी 2027 रोजी शांततापूर्वक आंदोलन देशभर करण्यात येणार आहे. शासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यास 27 जानेवारीपासून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ही आयोजकांनी यावेळी दिली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0