भद्रावती येथे श्री साईबाबा स्थापना दिन उत्सवानिमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.१२:- स्थानिक बगडेवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात दि. १८ , १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी श्री साईबाबा स्थापना दिन उत्सव निमित्य विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त भव्य शोभायात्रा, घटस्थापना, भजन, किर्तन रांगोळी स्पर्धा, भारूड, ह्दय रोग तपासणी शिबीर व महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे. दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. साईबाबा मूर्ती पूजन, घटस्थापना व आरती, ८.३० ते ११वा. स्वच्छता अभियान दुपारी १२ ते ४.३० वा. रांगोळी स्पर्धा ,दुपारी २ ते ५ भजन संम्मेलन, सायं ६ वा. साईबाबा ची आरती, ७ वाजता सागर महाराज नांदुरकर व संचयांचे भारूड. दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. श्री साईबाबा मूर्ती पूजन व आरती सकाळी १० ते २ हृदय रोग तपासणी शिबीर, सायंकाळी 3 ते ५ ह. भ. प.केशवानंद मेश्राम महाराज यांचे ज्ञानेश्वरी हरिपाठ, सांय ५ वाजता श्री साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रा काढण्यात येईल. कलशधारी महिला भगिनी, भजन दिंडी, श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध दृश्य ,संतोषी बँड पथक आणि दुर्गा वाहिनी आदि शोभा यात्रेचे विशेष आकर्षण असेल. ही शोभायात्रा श्री साईबाबा मंदिर बगडेवाडी इथून जुने वडाचे झाड, विठ्ठल मंदिर, किल्ला वार्ड, वाल्मीक चौक, जंगल नाका, परत जुना बसस्टॉप महात्मा गांधी चौक मार्गाने परत प्रारंभ स्थळी येईल. या शोभायात्रेत खा. प्रतिभा धानोरकर, केंद्रिय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, आ. करण देवतळे, तहसीलदार बालाजी महानंदाबाई शिवाजी कदम, ठाणेदार योगेश पारधी , मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी,स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुंडावार, जेष्ठ नागरिक विलास गुंडावार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,रॉ.कॉ. चे मुनाज शेख, विशाल गांवडे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. रात्रो १० वा. ओमसाई भजन मंडळ किल्ला वार्ड भजन संध्या सादर करतील. शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ वा. ह.भ.प. भुजंग खानोरकर महाराज यांच्या शुभहस्ते श्री साईबाबा मुर्तीचा अभिषेक ,सकाळी १० वा. श्री गुरुदेव सेवा मंडळ भजन संध्या सादर करतील. दुपारी १२ वा.वनसडी येथील ह.भ.प.नामदेवरावजी गुरुनुले महाराज व संच गोपाल काल्याचे किर्तन सादर करतील. याप्रसंगी वरोरा येथील जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी ३ वा. अहवाल वाचन , श्रध्दांजली व आभारप्रदर्शन आणि सायंकाळी ४ वा. महाप्रसाद वितरीत करण्यात येईल. या उत्सवात जनतेनी फार मोठया संख्येत सहभागी व्हावे. असे आवाहन श्री साई बाबा उत्सव समिती चे अध्यक्ष रामभाऊ बिरे, सचिव अनिल बगडे, संयोजक गोपाल ठेंगणे , रामराव भोगेकर,शालीक दानव, वसंता लोणकर, शरद राजुरकर , राहुल बोरकर, जिवनदास येरमे दत्ताञय गोवारदिपे, शंकरराव पत्तीवार प्रकाश बगडे, बाळकृष्ण कुटेमाटे, मनिष वाकडे, अभय बगडे रविंद्र गोवारदिपे विलास सातपुते तथा कार्यकारिणी सदस्य गणानी केले आहे.

भद्रावती येथे श्री साईबाबा    स्थापना दिन उत्सवानिमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन...                                     
Previous Post Next Post