खरप बु.-घुसर रोडवर ४०७ मालवाहू वाहनाचा भीषण अपघात; दोन कामगारांचा मृत्यू, ११ जखमी.* अकोला जिल्ह्यातील खरप बु. ते घुसर रोडवर आज संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास एमएच २८ एबी ९१५० क्रमांकाच्या ४०७ मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाहेरून कामासाठी आलेल्या कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १२ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये मुन्नीबाई जांभेकर (४९) आणि मनीष कासदेकर (३७) यांचा समावेश आहे. ते मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील कालापडा तालुक्यातील खाकनार येथील रहिवासी आहेत. जखमींना तात्काळ अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वंचित येथील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी जखमी कामगारांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास मदत केली.अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. *अकोला प्रतिनिधि इमरान खान*
byमीडीया पोलीस टाईम
-
0