तपोवन रामाचे कि रावणाचे? नाशिक येथील तपोवन ची जमीन फडणवीस आणि महाजन गिळंकृत करण्यासाठी सरसावले आहेत.म्हणे आम्ही झाडे तोडून बंगले बांधणार.शो रूम बांधणार.मग नागा साधू येणार.मजा मारणार.गांजा अफू चरस हुक्का मारणार.नंतर ही जमीन अदानी अंबानी सारखे लोकांना देणार.पैसा घेऊन मालामाल होणार.हे ठरलेले आहे.कुंभमेळा भरवत आहेत कि पैशांची पोतडी भरत आहेत? यांचा अंदाज नाशिक चे नागरिकांना आला आहे.म्हणून ते तपोवनची झाडे तोडण्यास विरोध करीत आहेत.आमचे तपोवन असेच राहिल.साधू संत येतील जातील.काही फरक पडत नाही.पण तपोवन चे पावित्र्य नष्ट होऊ देणार नाहीत. सरकार मधील मंत्री फडणवीस आणि महाजन यांच्या विरोधात नाशिकची जनता ,असा हा लढा सुरू झाला आहे.नाशिक मधील प्रत्येक बाई माणसाला, पोराला वाटते कि आमच्या नाशिकमध्ये चोर शिरले आहेत.ते आमचे नाशिक लुटत आहेत.फडणवीस आणि महाजन विषयी भयंकर राग दाटलेला आहे.हे जरी स्वताला नेते म्हणत असतील पण एकटे दुकटे सापडले कि जनता यांचा रावण बनवतील.म्हणून हे पोलिस शिवाय लघवीला ही जात नाहीत.का? त्यांना भीती वाटते कि आपण रावणासारखे पाप करीत आहोत.अरे मग,भीती वाटावी, लोकांनी रावण म्हणावे असे पाप का करावे? फडणवीस यांनी अट्टल चोरांना मंत्री बनवून महाराष्ट्र लुटण्याचा मोठा धंदा सुरू केला आहे.एकसे बढकर एक चोर,पापी,हरामी त्यांनी सोबत घेतलेला आहे.ज्यांचेवर त्यांनीच शिक्का मारलेला आहे.त्यापैकी एक, गिरीश महाजन नावाचा मंत्री नाशिक लूटायला पाठवला आहे.असा समज दृढ झाला आहे. गिरीश महाजन यांनी जलसंपदा खात्यात अजित पवार पेक्षा जास्त भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठलेला आहे.पण फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत आहेत म्हणून ते बोलत नाहीत.महाजन चक्की पिसींग पिसींग. मी जळगाव चा माणूस.महाजन यांच्याच जिल्ह्यातील.अमळनेर तालुक्यातील सात्री गावाची पुनर्वसन प्रक्रिया में २०२२ पर्यंत पुर्ण झाली आहे.जळगावचे तीन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा आदेश दिले कि धरणग्रस्तांंना भुखंड वाटप करावेत.पण महाजन करू देत नाहीत.कारण महाजन यांना उजाड गावांसाठी ३ कोटी ८६ लाखाचा रस्ता बनवायचा आहे.फक्त १ किलोमीटर.तो सुद्धा मुरूम मातीचा.आधिकतम खर्च फक्त ३० लाख.तरीही महाजन यांनी ३ कोटी ८६ लाखाची वर्क काढली आहे.तब्बल साडेतीन कोटींचा भ्रष्टाचार.फक्त एकाच कामातून. कुंभमेळा साठी फडणवीस यांनी २५ हजार कोटी महाजन यांना सोपवले आहेत.आपण गणित करा.किती खर्च होईल? आणि किती खिशात घालतील? आणि जर तपोवन ची झाडे तोडून ही १५ एकर जमीन अंबानी अदानी सारखे लोकांना दिली तर किती कोटी मिळतील?हा भ्रष्टाचार नाही का? नाशिकच्या लोकांनो, कुंभमेळा साठी “कुंभमेळा समीती” बनवा.त्यात नाशिक चे समाजसेवक,विचारवंत ,अभियंता, वकिल,सीए, आमदार खासदार, कलेक्टर,मनपा आयुक्त , पालकमंत्री यांना सदस्य ठेवा.तुम्ही ठरवा कु़ंभमेळा साठी काय काय बदल करावेत अथवा न करावेत.तसे आदेश कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना द्या.निर्णय समाजाने घ्यावा आणि काम सरकार ने करावे.कारण बुद्धी समाजाला असते आणि यंत्रणा सरकारकडे असते.हिच खरी लोकशाही.…शिवराम पाटील ९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव ७/१२/२०२५.
byमीडीया पोलीस टाईम
-
0