राज्यात गुटखा बंदी असतानाही विशेषत: नवी मुंबई, मुंबई, अहिल्यानगर, जालना, अकोला, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, बुलढाना, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर गुटखा, पान-मसाला, चरस व गांज्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरु आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सभागृहाचे सदस्य प्रत्येक अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करतात. मात्र सरकार तर्फे कारवाईचे आकडे सादर करण्यापलिकडे कोणतेच ठोस उत्तर मिळत नाही. घासून पुसून गुळगुळीत झालेल्या सरकारी पठडीतील उत्तरांनी हा प्रश्न सुटणारा नाही. आजवर झालेल्या कारवाईत फक्त छोटे मासेच गळाला लागले. मात्र ट्रकच्या ट्रक भरुन आजही बिनदिक्कतपणे गुटखा राज्यात येतोय. यातले मोठे गुन्हेगार खुलेआम फिरत असताना फक्त टपरी वाल्यांवर कारवाई करुन हे सारं थांबणारं नाही.गुटख्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांना पकडून त्यांच्यावर MCOC अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आज सभागृहात केली. मा. गृहमंत्री महोदयांनी विधी व न्याय विभागाच्या म्हणण्याचा दाखला देत, MCOC लागू करण्यासंदर्भात कोणत्या कायदेशीर अडचणी आहेत, हे सांगितले. कायद्यात सुधारणा करण्याबाबतही आश्वस्त केले.हे सर्व लवकरात-लवकर होईल, व बेकायदेशीर गुटखा विक्री पूर्णपणे थांबेल अशी अपेक्षा करतो. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0