वन्यप्राणी रोही आणि वानर यांनी तुर केली उद्ध्वस्त ____________________________. (विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम संजय भरदुक .. ). रिसोड --तालुक्यातील चिखली येथील शिवाजी यादव लाड या शेतकऱ्यांच्या गटक्रमांक ७७ क्षेत्र १ हेक्टर क्षेत्रावरील सर्व तुर पिकांची वन्यप्राणी रोही आणि वानर यांनी फस्त केली भरपूर प्रमाणात उद्ध्वस्त करून जास्तीत जास्त प्रमाणात माझे नुकसान झाले आहे आणि मी ते ट्रॅक्टर ने तुर नांगरणी केले आहे माझे एक ते दीड लाख रुपये पर्यंत नुकसान झाले असून वर्षे भराची पूर्ण मेहनत वाया गेली आहे लावलेला पैसा सुध्दा हाती आला नाही काय करावे समजेना असे जर झाले तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी राहील पुर्णपणे कोलमोडली आहे जगावं की मरावं असे आमचे हाल होत आहेत काबाडकष्ट करून सुध्दा जर हाती काहीच लागले नाही तर आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरत नाही तरी यावर शासनाने काही वन्यजीव चा बंदोबस्त करण्यासाठी उपाय करून आम्हाला योग्य न्याय देण्यासाठी शासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा.अशी माझी शेतकऱ्यांची मागणी व न्याय द्यावा ही विनंती .

वन्यप्राणी रोही आणि वानर यांनी तुर केली उद्ध्वस्त ____________________________.                                                                           
Previous Post Next Post