**निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने पार पाडा* *@)> पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी.*. (मानवत परभणी विभागीय संपादक.अनिल चव्हाण.)—————————निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभिर्याने पार पाडा अशा सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या सूचना : महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस अधिकार्यांची आढावा बैठक परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले. महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये शनिवारी (दि. 20) पोलीस विभागातील अधिकार्यांची आढावा बैठक पार पडली. आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, मतदान केंद्रे व त्याच्या परिसरात करण्यात येणार्या पोलीस बंदोबस्ताचा आढावा तसेच आवश्यक खबरदारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी आणि निवडणूक अधिकारी नार्वेकर यांनी उपस्थित अधिकार्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिले. तर निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने पार पाडावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी परभणी दिनकर डंबाळे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक मुख्यालय अनिरुद्ध काकडे, पोलीस निरीक्षक (विशेष शाखा) महेश लांडगे, पोलीस निरीक्षक नानलपेठ गणेश कदम, पोलीस निरीक्षक नवा मोंढा महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोतवाली विश्वास कासले, तसेच मनपाचे अधिकारी पवन देशमुख, तन्वीर बेग, विकास रत्नपारखे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0