*मानवत* येथे ५ व ६ जानेवारी रोजी होणार्या*तबलिकी ईज्तेमा* निमित्त यूवानेते डाॅ. अकूंशराव लाड व आमदार राजेश विटेकर यांनी दिली भेट.. (मानवत / प्रतिनिधी.)———————————मानवत येथे ५ व ६ जानेवारीला तबलिकी इज्तेमा; आमदार राजेश विटेकर व युवा नेते अंकुश लाड यांची इज्तेमा इदगाह ला भेट, सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना मानवत शहरात दिनांक ५ व ६ जानेवारी रोजी मुस्लिम बांधवांचा भव्य तबलिकी इज्तेमा आयोजित करण्यात आला. असून या धार्मिक कार्यक्रमासाठी मानवत व सेलू या दोन तालुक्यांतील हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर इज्तेमा यशस्वी व सुरळीत पार पडावा यासाठी शहरात जोरदार तयारी सुरू आहे.या अनुषंगाने पाथरी विधान सभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आमदार राजेश भैय्या विटेकर तसेच मानवत शहराचे विकासपुरुष, युवा नेते डाॅ. अंकुशराव लाड यांनी इज्तेमा इदगाह (ईदगाह मैदान) येथे प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी मानवत नगर परिषदे च्या माध्यमातून आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.या वेळी मानवत नगर परिषदेचे नगर सेवक नियमात खाॅन व सय्यद आरेफ यांनी इज्तेमा ईदगाह परिसरात अतिरिक्त एल.ई. डी. लाईट लावण्याची आवश्यकता असल्याचे मुस्लिम समाज बांधवांनी युवा नेते डाॅ. अंकुशराव लाड यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत युवा नेते डाॅ. अंकुशराव लाड यांनी नगर परिषदेच्या विद्यूत विभागातील अधिकारी व संबंधित यंत्रणेला त्वरित सूचना देऊन आवश्यक त्या व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.यावेळी मुस्लिम बांधवांशी बोलताना युवा नेते डाॅ. अंकुशराव लाड म्हणाले की, “इज्तेमा ईदगाह मैदानावर कुठल्याही प्रकारचे काम असो, सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मी सदैव तयार आहे.” तसेच पाथरी विधान सभा मतदार संघाचे यूवा आमदार मा. राजेश दादा विटेकर यांनी ही प्रशासन, आणि नगर परिषद आणि आयोजकांनी समन्वयाने काम करून भाविकांना कोणती ही अडचण येऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी भेटीदरम्यान स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा, वाहतूक व मूलभूत सुरक्षा यासह सर्व मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी मानवत शहर सज्ज होत असून तबलिकी इज्तेमा भक्तिभावाने व शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0