कुठे आणि का होत आहेत सरकारचे तक्तापालट, (जामनेर /प्रतिनिधी) पूर्ण विश्वामध्ये भरपूर देशांमध्ये तक्तापालट होताना आपण बघितले, तक्ता पालट देशांमध्ये श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, अशा अनेक देशांमध्ये सरकारचा तक्तापालट जनतेने केलेला आहे, जनता का तक्ता पालक करीत असेल, हा विचार करणे महत्त्वाचे आहे, कारण तक्तापालट करणे म्हणजे मिळालेल्या स्वातंत्र्याचे व जनतेने निवडून दिलेल्या सरकारला विरोध करून किंवा सरकारच्या विरोधात लढून त्या सरकारला हरवून इतर व्यक्तीला त्या खुर्चीवरती बसवणे, व आपल्या देशाचा सर्व अधिकार त्या व्यक्तीला द्यायचा एवढे कार्य करण्यासाठी जनतेला आपला जीव धोक्यात घालावा लागतो, आपल्या देशातील नेत्यांच्या विरोधात आंदोलने करणे, रस्ता रोको आंदोलने करणे, कार्यालय टाळे ठोक आंदोलने करणे, सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणे ,हे सर्व लढाई जीवघेणी असून देखील जनता सरकारच्या विरोधात लढाई लढत आहे, आपण श्रीलंका मध्ये तक्तापालट का झाला याचे मुद्दे बघू, 1) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, 1)रोजगारांना योग्य मजुरी वेतन नाही२) शिक्षण विद्यालयांमध्ये मोठी फी वसुली ( डोनेशन) ३) मागासलेल्या जमातींच्या राखीव निधी मध्ये भ्रष्टाचार ,4) शासकीय कार्यालयांमध्ये असविधानिक पद्धतीने पैशाची मागणी करणे, 5) नेत्यांमध्ये राष्ट्रप्रेम नसणे, नेत्यांची संपत्ती सुख सोयी हाय लेवलच्या असणे, 6) देशाचा विकास होत नसल्याने, 7) सरकारने मोठमोठे घोटाळे केल्यानेअशा अनेक कारणाने श्रीलंकेमध्ये तक्तापालट झाले आहे ,कारण तक्ता पालट करण्यासाठी ज्या देशातील नागरिकांमध्ये देश प्रेम ,आपुलकी व देशाचा विकास व्हावा अशी दृढ इच्छाशक्ती असणारी जनताच तक्ता पालट करून ,योग्य शासक निवडून ,सरकारी खुर्चीवरती बसवतील ,तोच देश विकास करेल, श्रीलंकेची जनता क्रांतिकारी आहे ,व त्यांच्यामध्ये त्यांच्या देशाबद्दल प्रेम आहे ,आज ना उद्या श्रीलंकेचा विकास होणारच परंतु ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार आणि देशाचा विकास झालेला नाही, शेतीमालाला, रोजगारांना ,नोकरदारांना, योग्य वेतन नाही ,अशा देशांनी सुद्धा सरकारच्या विरोधात आंदोलने करून सरकार जवळून आपला अधिकार घ्यायला हवा, तरच आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होईल ,नाहीतर हम जिये भी तो क्या और हम मरे भी तो क्या या म्हणीप्रमाणे आपले हाल होतील ,विश्वातील प्रत्येक देशाच्या मंत्र्यांनी ज्या त्या देशाच्या जनतेला, जातीभेद मध्ये अटकवून ठेवलेले आहे, फोडा आणि राज्य करा ,या पद्धतीने नेते देशातील जनतेचे शोषण करीत असतात ,त्यांच्या राखीव निधी खात असतात ,जर (अ)समुहाचा पैसा नेत्यांनी खाल्ला तर (ब)समूहाला माहिती जरी मिळाली तरी तो (ब) समूह आवाज उठवत नाही (क) समूहाचा निधी गडप केला आणि( अ)समुहाला माहिती जरी असली तरी (अ)समूह आवाज उठवीत नाही अशाप्रकारे सरकार मधील नेते सर्व जाती धर्माच्या लोकांच्या पैसे निधी गडप करतात ,व आपण म्हणतो की माझ्या समूहाचे पैसे थोडी खाल्ले, आपण जर प्रत्येक समूहाच्या निधीचा योग्य वापर करण्यास सरकारला भाग पाडले तर, आपला देश नक्कीच विकास करेल, पत्रकार अंबादास संतोष जाधव 9767022719

कुठे आणि का होत आहेत सरकारचे तक्तापालट,  
Previous Post Next Post