वर्धा शहरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि ठोस कारवाई करत मॅफेडॉन (MD) तस्करी करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹2,28,550/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने धुनीवाले चौक परिसरात नाकाबंदी करून पंचासमक्ष सापळा रचला. या दरम्यान संशयित आरोपीकडून अवैध मॅफेडॉनची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.जप्त मुद्देमालाचा तपशील :मॅफेडॉन (MD) – 41.07 ग्रॅम(प्रति ग्रॅम ₹5,000/- प्रमाणे) किंमत ₹2,05,350/-CMT कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल – ₹10,000/- हिरो कंपनीचा मोबाईल – ₹3,000/-रेडमी कंपनीचा मोबाईल – ₹10,000/-हिरवट रंगाची सॅग बॅग – ₹200/-एकूण जप्त मुद्देमाल : ₹2,28,550/-आरोपींची माहिती :शुद्धोधन मुकुंद माटे, वय 36 वर्षेरा. नागसेन नगर, नालवाडी, ता. जि. वर्धातसेच या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगी सहभागी असल्याचे उघड झाले आहे.आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8(क), 21(ब), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही संपूर्ण कारवाई सौरभ कुमार अग्रवाल (पोलीस अधीक्षक, वर्धा),सदाशिव वाघमारे (अप्पर पोलीस अधीक्षक)आणि मा. प्रमोद मकेश्वर (उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.प्रभारी पोलीस निरीक्षक टाले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टोपले तसेच दारूबंदी पथकातील अंमलदार अवि बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले, नितेश वैद्य व महिला अंमलदार कुंदा तूरक यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा इशारावर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे...मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

वर्धा शहरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि ठोस कारवाई करत मॅफेडॉन (MD) तस्करी करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ अटक 
Previous Post Next Post