कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथे सायबर क्राईम व क्राईम डायल 112, मुलींवर लौगिक अत्याचार, वाहतुकीचे नियम,मार्गदर्शन करण्यात आले ... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती :- आज दिनांक 6/1/2026रोजी सायंकाळी 7 वाजे महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार प्राप्त ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा ता देवळी जि वर्धा व्दारा संचालीत कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील वसतीगृहात पोलिस स्टेशन देवळी येथील मा गजानन जी महाकालकर पोलिस कास्टेबल देवळी यांच्या टिम कडून वसतीगृहात संस्थेचे सचिव श्री डॉ अशोक दिगांबर जाधव वसतीगृहाचे अधिक्षीका कु एस एफ राठोड यांच्या उपस्थितीत वसतीगृहातील मुलींना मार्गदर्शन करण्यात आले, सायबर क्राईम,डायल-112, मुलीवर लैंगिक अत्याचार,वाहतुकीचे नियम,वाटसफ, इंस्टाग्राम, फेसबुक, आँनलाईन, फसवणूक,गुड टच,बाॅड टच,या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे पोलिस वर्धापन दिनानिमित्त दिनांक 2/1/2026 ते 8/1/2026 पर्यंत राॅयजीग डे संबंधाने वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांना यांना पोलीस कामकाज विषय माहिती पुरविण्यात संबंधित कार्य शाळा मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वेळी त्यांना कुठल्याही प्रकारे अडचणी असतील तर वसतीगृहातील अधिक्षीका मॅडम व शाळेत राहते वेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक मॅडम यांच्या सोबत भेटून आपणास अडचणी निर्माण झाल्या आहेत असे वेगवेगळे विषय संदर्भांत सविस्तर माहिती देण्यात आली आहे व मुलीवर लैंगिक अत्याचार बाबत माहिती देण्यात आली, वाहतूकीचे नियम, स्टेशन डायरी, ठाणेदार कक्ष, गोपनीय माहिती, क्राईम नोंद,त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी बिनधास्त येवून, फोन नंबर देण्यात आले आहेत यावेळी संस्थेचे सचिव श्री डॉ अशोक जाधव सर यांच्या कडून सर्व पोलीस कर्मचारी बांधवांचे सत्कार करण्यात आले तसेच वसतीगृह अधिक्षीका मॅडम यांनी मा श्री गजानन जी महाकालकर पोलिस कास्टेबल , गणेश बावणे, हेड कॉन्स्टेबल,कमलनय तिवारी हेड कॉन्स्टेबल,विहा वाघ ,महिला कॉन्स्टेबल, भाग्यश्री उमाटे महिला कॉन्स्टेबल यांचे सर्व प्रथम सत्कार करण्यात आले आभार प्रदर्शन कुमारी किर्ती कुसवा यांनी केले
byमीडीया पोलीस टाईम
-
0