नगरपरिषद हिंगणघाट येथे शहराच्या नियोजित व संतुलित विकासासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.📅 दिनांक : ०५ जानेवारी २०२६📍 स्थळ : सभागृह, नगर परिषद कार्यालय, हिंगणघाटया बैठकीत शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व नाले, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, तक्रार निवारण यंत्रणा तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची तपशीलवार समीक्षा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करत, कामांची गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि पारदर्शकता राखण्याबाबत ठोस निर्देश देण्यात आले.नगराध्यक्ष म्हणून नागरिककेंद्रित प्रशासन देणे हे प्राधान्य असल्याचे अधोरेखित करत, कार्यसम्राट आमदार मा.श्री. समीरभाऊ कुणावार तसेच मुख्याधिकारी श्री. प्रशांतजी उरकुडे,नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर यांच्या उपस्थितीत विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागासमोर असलेल्या अडचणी समजून घेत तात्काळ उपाययोजना व परिणामकारक अंमलबजावणीवर भर देण्यात आला.या आढावा बैठकीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करून हिंगणघाट शहर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि विकासाभिमुख बनवण्याचा ठाम संकल्प व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवून मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0