*गोगलगाव* येथील प्रकल्पाची चौकशी करा... ( मानवत / प्रतिनिधी.)————————————— मुख्यकार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद कार्यालयाकडे नागरिकांनी परभणी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून गावातील निकृष्ट (बोगस) जलजीवन योजना कामाच्या चौकशीची मागणी केल्यामूळे चे पत्र दिल्यामुळे कार्यकारी अभियंता श्री घुगे यांची तक्रारदाराला दमदाटी करून नादाला लागाल तर हात धूऊन बसाल अशी धमकी दिल्याने गोगलगाव येथील प्रकल्पाची उच्चस्तरीय समितीच्या वतीने चौकशी करावी अशी मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, मोजे गोगलगांव येथील जनजीवन याजनेअंतर्गत रूपये *एक कोटी चौरेचाळीस लाख रुपयांचे* काम करण्यात आले आहे. पण हे काम निकृष्ट व बोगस करण्यात आले आहे. या संदर्भात श्री रामेश्वर तुकाराम गुरव यांनी दि. 19/09/2025 रोजी या संदर्भात कार्यकारी अभियंताच्या यांच्या बोगस कामाचे चौकशी चे पत्र दिले. या पत्रा संदर्भात श्री. गूरव यांनी कार्यकारी अभियंता यांना फोन केला व कामा संदर्भात विचारणा केली असता अभियंता श्री. घुगे म्हणाले ने काही काम झाले आहे ते झाले आहे. कोणत्याही कामाची यांना चौकशी होणार नाही. तुला काय करायचे आहे ते कर कोणाकडे तक्रार करायची असेल तर कर मी म्हणालो की, मो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटतो तर श्री. पुगे म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हे माझे काहीही वाकडे करणार नाहीत, मी कोणाच्या बापाला भीत नाही. असे कर्तव्यदक्ष अधिकारी जर लोकप्रतिनिधी ला अशी अरेरावीची भाषा करीत असेल तर सर्व सामान्यांची काय अवस्था असेल या भ्रष्ट अभियंत्यांना पाठीशी कोण पाठीशी घालत आहे. अभियंता केवळ भ्रष्ट कामे करून कंत्राटदारांकडून मलीदा खाऊन चढला आहे.या निवेदना सोबत दि. 19/09/2025 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत जोडत आहे. मा. मूख्यकार्यकारी अधिकारी यांनी या कामाची सखोल चौकशी करून अशा भ्रष्ट अभियंत्यांना त्याची जागा दाखवाची हि नम्र विनंती. रामेश्वर तुकाराम गुरव (ग्रामपंचायत सदस्य) गोगलगांव यांनी केली आहे.*

गोगलगाव* येथील प्रकल्पाची चौकशी करा...                                       
Previous Post Next Post