अकोला:- दि. 12/012026 रोजी जिल्हाधिकार्यालय अकोला येथे लातुर जिल्ह्यातील, औसा तालुक्यातील टाका गावच्या अनुसूचित जातीतील, मातंग समाजातील विध्यार्थीनीचे लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथे स्व.अनुष्का किरण पाटोळे या 12 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला असुनहे प्रकरण अतिशय संशयास्पद आहे, लातूर नवोदय विद्यालय प्रशासनाने या प्रकरणाला आत्महत्याच स्वरूप दिले असून स्वर्गीय अनुष्काचे मागील काळातील वागणूक, शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग, एकंदरीत धाडसी स्वभाव/ व्यक्तिमत्व पाहता एवढी हुशार व मुलगी तेही फक्त 12 वर्षाची असताना आत्महत्येचा निर्णय कसा घेऊ शकते? असे अनेक प्रश्न अनुष्काचे कुटुंब व समाज बांधव या नात्याने आम्हाला सर्वांना पडले आहे, अनुसूचित जातीतील एका गुणवंत 12 वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय मध्ये पद्धतीने मृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सर्व समाज बांधवांच्या वतीने आपण या संदर्भात त्वरित एसआयटी स्थापन करून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश द्यावे व दोषींना कठोर शिक्षा द्यावी याकरिता अकोला जिल्हा समस्त मातंग समाजावतीने निवेदन देत आहोत.. याप्रसंगी, युवा नेते परिमल कांबळे, रामदास तायडे, प्रकाशजी तायडे, विष्णू भाऊ शेलारकर, जयदेवजी इंगळे, यशोदाबाई गायकवाड, सुभेदार रमेशजी खंडारे, विजयजी बांगर, प्रकाशभाऊ तायडे, राहुल तायडे, ऋत्विक बोरकर, सागर नाटेकर, गिरीश बांगर, श्रीकृष्ण चव्हाण, रुपेश बोरकर, सौ छाया अंभोरे, संगीता वानखडे, राजेश खंडारे, श्याम तायडे, सुनील धुरदेव, विनोद खवेकर सुभाष वानखेडे, अनिकेत तायडे, गोविंदा साबळे, गोदावरीताई भटके, विमलताई वानखडे, संगीताताई वानखेडे, पुष्पाताई अंभोरे, अनिल सपकाळ, अमर इंगळे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0