अनुष्का तुझ्या पेक्षा आमचा इगो व तलबी खुप मोठ्या आहेत बाळा, तुच काय आणखी तुझ्यासारख्या कित्येक गेल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे तु गेल्याने फक्त औपचारिकता पुर्ण करुन आम्ही आमचे बैदफैली संदेश पाठवत आहोत. खुप दळभद्री आवस्थेत आहोत परंतु बाळा आम्हाला माफ कर आम्ही देखील फकिरा सारखे आतून बाहेरुन घेरल्या गेलोत. अनेक प्रकरणात आवाज उठवणारे आम्ही अगदी त्या नटरंग मधल्या सम्राटासारखे खोट्या आरोपांनी इतके बदनाम झालोत की, त्यामध्येच आमचा शेवट निश्चित आहे. कारण या समाजातल्या शिक्षीत, धनवंतानी तसा विडा उचलला आहे. तरी जसे जमेल, जितके जमले तसे लढू तुझ्या आई, वडिलांना भेटलो. तुझे घर, तुझा भाऊ यांची विचारपुस केली. मनसुन्न झाले, घालमेल झाली, पोलिस अधिक्षक यांना तब्बल अर्धा तास चर्चा केली. यामध्ये अनेक प्रश्न, शंका या दृष्टीने तपासाची दिशा, लावण्यात आलेले सेक्शन, याचा आढावा घेतला. स्व:ता यंत्रणेतील उच्चधिकारी हत्येची शंका मान्य करतात परंतु बिएनएस सेक्शन 103 अद्याप लागले नाही. पोलीस अधिक्षकासोबत चर्चा, आई वडिलासोबत चर्चा व किरण गायकवाड सोबत चर्चेवरुन या प्रकरणात खुप मोठा कट सुनियोजीत पध्दतीने शिजत असल्याचा अंदाज आला आहे. पोलीस अधिक्षक व पोलीस यंत्रणा यांनी दाखल सेक्शन 108 चे समर्थन करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी पिएम रिपोर्ट तसा बणवत तो पुरावा तयार केला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी देखील आतून सहभागी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अता पोलीस यामध्ये हत्येचे सेक्शन दाखल करणार नाहीत जर त्यांना ते दाखल करायचे असते तर त्यांनी दोण अटक आरोपीला एमसिआर मिळू दिला नसता. दिनांक 2 ते 4 पर्यंत बाहेरील सिसिटीव्ही फुटेजमधले सर्व संशयीत ताब्यात घेऊन तपास केला असता. परंतु तसे न करता पोलीस फक्त सारवा सारव करत दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे लक्षात येत आहे. एकतर झोपलेला समाज, आवसरवादी समाज, बुजदील व आत्मकेंद्री समाज व कर्मचारी संघटना मदमस्तीत आहे. त्यामुळे आम्ही तिथे गेलो असता तो हल्लाकल्लोळ सोशल मिडीयावर आहे त्यादृष्टीने स्थानिक वातावरण अगदी शांत वाटले. खोलवर चर्चेतून असे समजते की, लातूर एलसिबीने स्थानिक कार्येकर्त्याना दुर राहण्याचा इशारा दिला आहे व तो पैत्रा काम करत आहे. वरील हे सर्व स्थिती ही मातंग समाजासाठी आव्हाणात्मक आहे स्विकारायचे का आमच्या तलबी दुनियेत मदमस्त रायचे ते प्रतेकाने ठरवले पाहिजे. समाजाला शिस्त लावता लावता आम्ही बदनाम झालो परंतु शिस्त लागली नाही. परंतु या बेशिस्तीचा, मग्रुरीचा, संधिसाधू वृत्तीचा, राजकीय चापलूसीचा हा भयानक परिणाम आहे जर इथे आत्मभान पेटले नाही तर हा समाज नाही हेच सिध्द होईल. " *येतील वादळे, खेटेल तुफान,तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही..* " *अनुष्का हम शर्मिंदा हैं, पर लढेंगे ऐ वादा हैं "* ॲड. विलास साबळे(संस्थापक अध्यक्ष मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य)
byमीडीया पोलीस टाईम
-
0