तुमच्या मायेपुढे प्रत्येक पराभव लहान वाटतो! सोनल देवतळे.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) चंद्रपूर दि.17 :-चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूने लागला नाही, ही एक वेदना आहे; पण या प्रवासात तुमच्याकडून मिळालेली माया, विश्वास आणि आपुलकी यामुळे मन भरून आलं आहे, अशी हळवी भावना सौ. सोनल प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केली. प्रचाराच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक भेटीत तुमच्या डोळ्यांत दिसलेली आशा, हातात दिलेला धीर आणि शब्दांशिवाय व्यक्त झालेली साथ आजही मनात जपून ठेवलेली आहे. तुमच्या अपेक्षांवर पूर्ण उतरता न आल्याची खंत आहे; पण तुमच्या मायेने मला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, असं त्या शांतपणे सांगतात. निवडणूक संपली असली तरी तुमच्याशी बांधलेलं नातं संपलेलं नाही. पद, सत्ता किंवा अधिकार नसले तरी तुमच्या सुख-दुःखात सोबत उभं राहणं, तुमचं ऐकून घेणं आणि शक्य तेवढी मदत करणं हीच माझी खरी ओळख राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडून आलेल्या प्रतिनिधींना मनापासून शुभेच्छा देत, परिसराच्या भल्यासाठी सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. “हा परिसर माझ्यासाठी केवळ राजकारणाचा भाग नाही, तर भावना, आठवणी आणि नात्यांनी जोडलेलं घर आहे,” असे सांगताना त्यांच्या शब्दांत कृतज्ञतेची झुळूक जाणवत होती. या संपूर्ण प्रवासात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाची मी मनापासून ऋणी आहे.तुमची माया हीच माझी ताकद आहे… आणि तीच मला पुढे चालायला शिकवते.

तुमच्या मायेपुढे प्रत्येक पराभव लहान वाटतो! सोनल देवतळे..                                                                                   
Previous Post Next Post