दिनांक : १३ जानेवारी २०२६ स्थळ : नगरपरिषद सभागृह, हिंगणघाट जिला वर्धा आज हिंगणघाट नगर परिषद सभागृहात नवनिर्वाचन नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर मुख्याधिकारी मा. श्री. प्रशांत उरकुडे जी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची अधिकृत नियुक्ती पार पडली. हा महत्त्वपूर्ण प्रसंग नगरपरिषदेच्या सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी एक नवा अध्याय ठरणारा आहे.या वेळी भारतीय जनता पार्टी श्री. निलेश बाबाराव ठोंबरे जी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तसेच श्री. किशोरभाऊ मनोहर दिघे जी, श्री.अंकुशभाऊ बिरबलसिंह गौतम (ठाकुर) जी आणि सौ. शारदाताई भरतलाल पटेल जी, ऍड सुधीर कोठारी जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पक्ष यांची स्वीकृत सदस्य नियुक्तियां करण्यात (नगरसेवक) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि सेवाभावामुळे हिंगणघाट शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.नवनियुक्त उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांचेहिंगणघाटच्या नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे सक्षम प्रशासन, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कटिबद्ध राहू. जनतेच्या सहकार्याच्या बळावर हिंगणघाटला एक आदर्श, प्रगत आणि सुशासित शहर म्हणून घडविण्याचा आपला निर्धार अधिक दृढ होईल..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

Previous Post Next Post