नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकनियुक्त नव्या नगराराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील होणार खुर्चीवर विराजमान.. पदग्रहण सोहळ्यास आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व अॅड संदीप भैय्या पाटील यांची खास उपस्थिती ..डिसेंबर ३०, २०२५ नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकनियुक्त नव्या नगराराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील होणार खुर्चीवर विराजमान.. पदग्रहण सोहळ्यास आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व अॅड संदीप भैय्या पाटील यांची खास उपस्थितीचोपडा दि.३०( संजीव शिरसाठ)चोपडा नगरपालिकेच्या उच्च विद्या विभूषित तरुण तडफदार शिवसेनेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील या आपल्या पदाच्या पदभार नववर्षाच्या नवा नव्या पहाटेला करणार असून शहर विकासाच्या महत्त्वपूर्ण खुर्चीवर त्या विराजमान होणार आहेत. हा पद ग्रहण सोहळा कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष एडवोकेट संदीप भैय्या पाटील, डॉ. सौ. स्मिता ताई पाटील यांच्या खास उपस्थितीत होणार असल्याने आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. नगरवासीयांची कामांची सुरुवात नव वर्षाच्या पहिल्याच दिवसाने होत असल्याने "वेल बिगेन ईस हाफ डन" या इंग्रजी उक्तीप्रमाणे होण्याची आशा पल्लवित झाली आहे.पदग्रहण सोहळ्याचा शुभारंभ दिनांक एक जानेवारी 2026 रोजी दहा वाजेला मुजुमदार गणपती मंदिरातील गणरायाचे दर्शन घेत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत नगरपालिका सभागृहात आगमन होणार आहे त्यानंतर मुख्याधिकारी रामनिवास झवंर यांच्यासह सर्व मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आणि पदाधिकारी यांच्या समक्ष पदग्रहण होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, माजी सभापती सुरेश बापू पाटील संचालक नंदकिशोर सांगोले एडवोकेट शिवराज पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, उद्योजक रवींद्र बळीराम पाटील, माजी नगरसेवक महेंद्र धनगर, नंदू गवळी,धीरज गुजराथी,प्रदीप बारी,दीपक चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान काल दिनांक 30 रोजी उद्योजक रवींद्र बळराम पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ नम्रता ताई पाटील, उद्योजक सचिन पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील यांच्या परिवारातर्फे नाभिक समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. उमाकांत निकम यांना वाढदिवसाचे औचित्य साधत पुष्प गुच्छ देऊन सदिच्छा देण्यात आल्या.

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकनियुक्त नव्या नगराराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील होणार खुर्चीवर विराजमान.. पदग्रहण सोहळ्यास आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व अॅड संदीप भैय्या पाटील यांची खास उपस्थिती ..
Previous Post Next Post