तिकीट वरस ठरतं आता फुकट सतरंज्या झेंडे उचलणाऱ्यां ची भरती सुरू होणार आजचा आपल्या आवडत्या पक्षांच्या कार्यालयाशी संपर्क साधा . (जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रवीण मेघे )निवडणुकीचा खेळ रंगत आला आता सतरंज्या उचलण्याचा हंगाम अधिकृत सुरू महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपाचा तमाशा अखेर आपल्या कळसावर पोहोचला आहे गेले काही दिवस राजकीय वर्तुळात जे रणक नंदन सुरू होते त्याच्या आज शेवटचा बंडा पडतोय उमेदवारी अर्ज भरणे एबी फॉर्म साठी पायाला भिंगरी लावून धावपळ करणे पक्ष कार्यालयाभोवती गर्दी आमदार खासदारांना घेराव घ**** रडा रड मन धरणे नाराजी तक्रारी हा सारा लोकशाही नाट्यप्रयोग आता तात्पुरता गुंडाळला जात आहे आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस म्हणजेच निवडणूक प्रक्रियेचा पहिला अंक संपन्न मात्र राजकारणात पंडे कायमचे पडत नसतात नाटकाचा दुसरा अंक आता सुरू होतो प्रचाराचा आणि प्रचार म्हटला की अचानक आठवण होते ती निष्ठावंत कार्यकर्त्याचे हे तेच कार्यकर्त्याचे आहेत ज्यांच्याकडे नगरसेवक होण्याची पात्रता होती निवडणूक लढवण्याची त्रीव इच्छा होते ज्यांनी पक्षासाठी वर्षं वर्षे झेंडे उचलले सभा फिरवल्या कार्यकर्त्याची फौज उभी केली पण तिकीट वाटपाच्या वेडे मात्र त्याचं नाव यादीत बसत नव्हतं काहींची तिकीट कापली गेली काहींना माघार घ्यायला भाग पाडलं गेलं तर काहींना थांबा पुढच्या वेळी मोठे संधी देऊ आमदारकीपर्यंत पोहोचलो अशी गोड आश्वासनाचे गोडी दिली गेली आणि गंमत म्हणजेच हेच नाकारलेले कार्यकर्ते आता पुन्हा मैदानात उतरवले जाणार आहेत सतरंज्या उचलण्यासाठी त्याच कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ज्यांना तिकीट दिल गेलं अशा उमेदवाराचा प्रचार करायचा आहे ज्यांना स्वतःची उमेदवारी नाकारली गेली त्यांनीच आता दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचं हीच खरी राजकीय निष्ठा कालपर्यंत पक्ष कार्यालयाच्या पायऱ्या झिंजवणारे आमदार खासदारांच्या भेटीसाठी तासन्तास वाट पाहणारे चेहरे आता नव्या भूमिकेत अवतरतील सभा मेळावे झेंडे खुर्च्या सतरंज्या बॅनर घोषणा आणि त्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर फुकट मंजुराचे भरती सुरू होणार आहे विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही जाहिरात लागत नाही फुकट क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्या आवडत्या पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावावी मंत्री आमदार खासदार नगरसेवक यांच्या जवळच्या माणसाशी सलंगी वाढवावे एवढेच आलेखित नियम आहे निवडणूक आली की निष्ठेला अचानक प्रचंड महत्व प्राप्त होत उमेदवाराच्या यादीत नाव नसलं तरी सतरंज्या उचलण्याच्या यादीत नाव हमखास असतं आणि ही सेवा फक्त निवडणूक काळापूर्ती नसते तर पुढील पाच वर्षाच्या आश्वासनावर चालणारी असते हे लक्षात ठेवायला हवं निवडणूक संपेल निकाल लागेल सत्तेची समीकरण बदलतील पण सतरंज्या झेंडे आणि खुर्च्या उचलणारे चेहरे मात्र तेच राहतील हेच या लोकशाही उत्सवाचा कंटू उपरोधिक आणि वास्तव चित्र आहे

तिकीट वरस ठरतं आता फुकट सतरंज्या झेंडे उचलणाऱ्यां ची भरती सुरू होणार आजचा आपल्या आवडत्या पक्षांच्या कार्यालयाशी संपर्क साधा .                          
Previous Post Next Post