जिद्द आणि चिकाटीने ६६ व्या वर्षी निवृत्त उपप्राचार्यांनी मिळवली 'आयुर्वेदिक आहार व पोषण' पदविका. (नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा, दि.०२ शिकण्याला वयाचे बंधन नसते हे शहादा येथील ६६ वर्षीय निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी. सी. पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आयुष्यभर विज्ञान विषयाचे धडे देणाऱ्या या सेवानिवृत्तांनी वयाच्या उत्तरार्धात 'आयुर्वेदिक आहार आणि पोषण' (Ayurvedic Diet & Nutrition) या विषयात पदविका (Diploma) मिळवून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.प्रा. डी. सी. पाटील हे शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जीवशास्त्र (Biology) विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि विविध विषयांचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे.हा पदविका अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त N.S.D.C. (National Skill Development Corporation) आणि केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (Skill India) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आयुर्वेद इन्स्टिट्यूटतर्फे राबवण्यात आला होता. प्रा. पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने हे कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले. विज्ञान शिक्षकाने निवृत्तीनंतर आयुर्वेदासारख्या शास्त्रात अशा प्रकारची व्यावसायिक पदविका मिळवण्याचे हे जिल्ह्यातील बहुधा पहिलेच आणि एकमेव उदाहरण मानले जात आहे.या पदविकेमुळे त्यांना आता आयुर्वेद अंतर्गत आहार आणि पोषण या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची तसेच या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ते गत सुमारे तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत.

जिद्द आणि चिकाटीने ६६ व्या वर्षी निवृत्त उपप्राचार्यांनी मिळवली 'आयुर्वेदिक आहार व पोषण' पदविका.                 
Previous Post Next Post