नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये; हिंगणघाट येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत आमदार समीरभाऊ कुणावार यांचे निर्देश *. . जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा देखील आढावा*तहसील कार्यालय, हिंगणघाट व पंचायत समिती, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट–समुद्रपूर–सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद, वर्ध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक उपविभागीय कार्यालय, हिंगणघाट येथे पार पडली.या बैठकीत हिंगणघाट तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सखोल व गावनिहाय आढावा घेण्यात आला. येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदारांशी सविस्तर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना, पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन व आवश्यक ठिकाणी दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. सर्व कामांची अंमलबजावणी ठरावीक कालमर्यादेत करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.याच बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचाही गावनिहाय आढावा घेण्यात आला. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याबाबत आमदार कुणावार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.गावागावातील पाणी प्रश्न वेळेत मार्गी लावून नागरिकांना दिलासा देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे प्रतिपादन करत आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून जबाबदारीने व प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी श्री. आकाश अवतारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प. वर्धा येथील कार्यकारी अभियंता श्री. परांडे, तहसीलदार श्री. योगेश शिंदे, गटविकास अधिकारी श्री. सावसाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच,ग्रामसेवक व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0