आश्रमशाळा मंगरूळ येथे नाईक महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न.. (रावेर (प्रतिनिधी):रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाच्या वतीने 'दत्तक गाव' मंगरूळ येथे आश्रम शाळेत विशेष हिवाळी शिबिराचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले..कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. पद्माकर पाटील यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ श्रमदान नसून ती विद्यार्थ्यांमध्ये समाजभान आणि राष्ट्रप्रेम जोपासणारी एक संस्कार शाळा आहे. 'मी नव्हे, तुम्ही' (Not Me But You) हे ब्रीदवाक्य समोर ठेवून विद्यार्थ्यांनी ग्रामविकासाच्या प्रवाहात सामील व्हावे."सात दिवसांच्या उपक्रमांची आखणी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन यांनी केले. त्यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ग्राम स्वच्छता, आरोग्य तपासणी, प्रबोधनपर व्याख्याने, पाणी अडवा पाणी जिरवा, पाणलोट व्यवस्थापन ,तसेचसामाजिक विषयांवरील सर्वेक्षण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या भूतकाळातील एन.एस.एस. शिबिरांच्या आठवणींना उजाळा दिला. शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कसा विकास होतो आणि शिबिरातील शिस्त आयुष्यभर कशी उपयोगी पडते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंगरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुभान भिलाला, उपसरपंच श्री.रमेश राठोड, ग्रामसेवक श्री.हंसराज शिरसाट, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जितेंद्र पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.उत्तम चव्हाण, समाजसुधारक श्री.प्रमोद वानखेडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. राजकुंडल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक अधिकारी एल. एम. वळवी यांनी मानले.

आश्रमशाळा मंगरूळ येथे नाईक महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न..           
Previous Post Next Post