जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आज आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.पुणे जिल्ह्यामध्ये बेल्हे हे गाव आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहाराचे खूप चांगले ज्ञान आहे.त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले . ग्रामपंचायत सदस्या पल्लवी ताई भंडारी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ,यांच्या शुभहस्ते शालेय बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. बाजारामध्ये मुलांनी मेथी ,पालक ,भोपळा, मिरची ,वांगी, भेंडी असा अनेक प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्यासोबत विविध प्रकारची फळे,खाऊ गल्ली, कडधान्य,किरकोळ विक्रीच्या वस्तू ,मनोरंजक खेळ बाजारामध्ये आणले होते. या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र पिंगट,सावकार पिंगट,कैलास औटी,स्वप्नील भंडारी,गणेश चोरे,मनुआप्पा भोरे, मा.अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले,स्वप्निल शिंदे, शालेय व्यवस्थापन सदस्य ईश्वर पिंगट, प्रशांत औटी,विलास पिंगट,स्वाती कोकणे,गोरक्ष शिरतर, पायल सोनवणे, नसरीन पठाण, सुवर्णा कदम यांनी यावेळेस उपस्थित राहून आंनदी बाजारात खरेदी करत प्रतिसाद दिला. पालकांनी बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये पंचवीस हजार रुपयांची उलाढाल बाजारात झाली. सर्व उपस्थित मान्यवरांनी ,पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .इतर वेळी आपल्या आई वडिलांबरोबर बाजार आणण्यासाठी जाणारे बालचमु आज स्वतः वस्तूंची देवाण-घेवाण करत होते व व्यवस्थित पैशाचा हिशोब करत होते हे पाहून शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी पालकांनी समाधान व्यक्त केले.शाळेच्या उपशिक्षिका मीरा बेलकर , उपशिक्षिक हरिदास घोडे,अशोक बांगर,रोहिदास साळवे,संतोष डुकरे,नूरजहाँ पटेल,प्रविणा नाईकवाडी , सुषमा गाडेकर ,अंजना चौरे या सर्व शिक्षकांनी या आनंदी बाजाराचे नियोजन केले. केंद्रप्रमुख वनिता हांडे ,विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Previous Post Next Post