*लोकमान्य विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.४:- येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रुपचंद धारणे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल वटे, पर्यवेक्षक आशुतोष सुरावार, ज्येष्ठ शिक्षिका प्रिया भास्करवार प्रभृती मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रुपचंद धारणे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रिया भास्करवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य धारणे यांनी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका अश्विनी कवरासे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0